मुंबई : कोणत्याही जेवणात लसणीचा वापर हा होतोच. भाजीपासून ते डाळ आणि इतर बाहेरील पदार्थांमध्ये देखील लसणीचा वापर केला जातो. तुम्ही कोणतंही स्ट्रिट फुड खाल्लात जसे की, वडापाव, मंच्युरीयन, चायनिज, मोमोज इत्यादी. या सगळ्यामध्ये लसणीचा वापर केला जातो. लसुन जेवणाची चव वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते आणि ते आरोग्यासाठी देखील फायदेशील मानले जाते.
बऱ्याचदा लोक औषध म्हणूनही लसूण खातात. त्याच वेळी, लसणाचे सेवन रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील केले जाते, लसूण सध्याच्या काळात म्हणजेच कोरोना काळात महत्वाचे मानले जाते.
लसणामध्ये ऍलिसिन असते आणि ते औषधी आहे, हे अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड विशेष प्रमाणात आढळते.
सल्फरमुळे, त्याची चव तिखट आणि वास तीव्र आहे. पण लसणाचे जास्त सेवन केल्यास ते तुमच्या शरीरासाठी हानिकारकही ठरू शकतं. जे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे प्रमाणातच याचं सेवन करा.
आज आम्ही तुम्हाला लसणामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती देणार आहोत.
जर तुमचं डोकं दुखत असेल आणि त्याच वेळी तुम्ही लसणाचं सेवन केलं, तर तुमची डोके दुखी आणखी वाढू शकते. बर्याच वेळा असे होते की, डोकेदुखीच्या वेळी लोक घरगुती उपचारांसाठी लसूण औषध म्हणून खातात. तज्ज्ञांच्या मते, असे केल्यामुळे तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते, त्यामुळे अशा परिस्थितीत लसणाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, त्यांनी लसूण जास्त खाऊ नये असा सल्लाही दिला जातो. पोटाची समस्या असूनही जर कोणी लसणाचे सेवन केले, तर त्याला अॅसिडिटीचा सामना करावा लागू शकतो.
ज्यांना तोंडातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार असेल त्यांनीही लसूण खाणे टाळावे. असे मानले जाते की, लसूण तोंडातून येणारा वास आणखीनच वाढवू शकतो, त्यामुळे त्यापासून दूर राहणे चांगले. श्वासाच्या दुर्गंधीमुळे तुम्हाला अनेकदा लाजीरवाणं व्हाववं लागत असेल तर अनेक घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. त्यात हिरवी कोथिंबीर खाण्याचाही समावेश आहे. परंतु लसूण खाणं तुम्हाला टाळावं लागेल.
लसणात सल्फरचे प्रमाणही जास्त असते आणि त्यामुळे ते अॅलर्जीचे कारण बनते. त्यामुळे ज्यांना शरीरात ऍलर्जीची समस्या आहे, त्यांनीही लसणाचे सेवन टाळावे. असे म्हटले जाते की, ज्या लोकांना लसूण जास्त प्रमाणात खाणे आवडते, त्यांना देखील ऍलर्जी होऊ लागते. लसूण मर्यादित प्रमाणात खाणेच तुमच्यासाठी चांगले आहे.
त्याला औषण म्हणून थोड्या प्रामाणात खावं, त्याचा अतिवापर तुमच्यासाठी धोक्याचा आहे.
(नोट : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)