तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!

कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 21, 2018, 11:02 PM IST
तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान! title=

मुंबई : आजच्या टेक्नॉसॉव्ही जगात टेक्नॉलॉजीपासून दूर राहणे तसे कठीण. पण, त्याचा अतिरेक करणे वाईट. आता कानात हेडफोन घालून ऐकण्याची सवयच पहा ना. तुम्हालाही कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

कानदुखी : सातत्याने कानात हेडफोन घालून संगीत ऐकण्याची सवय ही कानदुखीला निमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे हा त्रास वाढण्यापूर्वी वेळीच काळजी घ्या.

बहिरेपणा : आपला कान हा निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. ऐकणे हे त्याचे प्रमुख काम आहे. पण, किती प्रमाणातील आवाज ऐकायचे हे सुद्धा ठरलेले आहे. आपला कान फार तर, ६५ डेसिबल पर्यंतचा आवाज सहन करू शकतात. आपण जर सातत्याने काही तास हेडफोन लाऊन आवाज ऐकत असाल तर, तुमचा बहिरेपणा ठरलेला आहे.

झोपेचे खोबरे : सातत्याने हेडफोन लावने हे अतिशय धोकादायक आहे. सातत्याने हेडफोन वापरल्याने चिडचिडेपणा वाढतो. तसेच, झोपेचे खोबरे होणारे ठरते. अती हेडफोन वापरामुळे निद्रानासाचा विकार जडू शकतो.

बुद्धीचे नुकसान : कितीही झाले तरी हेडफोन हे सुद्धा विद्यूत चुंबकीय यंत्रच. सातत्याने हेडफोन वापरल्याने हेडफोनमधील चुम्बकीय तरंग आपल्या मेंदूपर्यंत गंभीर लहरी पोहोचवतात. अनेकांना रात्री कानात हेडफोन टाकून गाणी ऐकण्याची सवय असते. त्यांना विसरभोळेपणा, थिरथिरेपणा अशा प्रकारचा त्रास संभवतो.