जीम किंवा वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी करा हे ५ व्यायामप्रकार!

दिवसातील फक्त ३५ मिनिटे तुम्ही स्वतःसाठी देऊ शकलात तर तुम्ही फिट तर राहालच पण दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल

Updated: May 11, 2018, 08:48 AM IST
जीम किंवा वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी करा हे ५ व्यायामप्रकार! title=

मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्व जीवनशैलीत फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण दिवसभराच्या धावपळीत व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पण दिवसातील फक्त ३५ मिनिटे तुम्ही स्वतःसाठी देऊ शकलात तर तुम्ही फिट तर राहालच पण दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. दररोज जीमला, वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी तुम्ही हे व्यायामप्रकार करु शकता. त्यामुळे नक्कीच फिट राहण्यास मदत होईल. 

सूर्य नमस्कार

हा एक कार्डियो-वस्कुलर व्यायाम आहे. यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. सूर्यनमस्कारामुळे कमी वेळात शरीराला उत्तम व्यायाम घडतो. दररोज १५-२० मिनिटं सूर्यनमस्कार घाला. 

प्रणाम मुद्रा

हाताचे दोन्ही पंजे एकमेकांना जोडून घ्या आणि संपूर्ण वजन दोन्ही पायांवर समान ठेवा. त्यानंतर छाती फुलवा आणि खांदे रिलॅक्स राहु द्या. श्वास घेताना दोन्ही हात खांद्यातून वर उचला आणि श्वास सोडताना छातीजवळ प्रणाम मुद्रेत आणा.

जिने चढा उतरा

वॉक घेणे शक्य नसेल तर १५ मिनिटे जिने चढा आणि उतरा. हे ४५ मिनिटांच्या वर्कआऊट समान आहे. ३० मिनिटे पायऱ्या चढल्या उतरल्याने कमीत कमी १०० कॅलरीज बर्न होतात. 

जॅपिंग जॅक

शरीर फिट आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी जॅपिंग जॅक अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी दोन्ही पाय एकमेकांना जोडून ठेवा आणि ते ओपन करताना दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. असे एक ते दीड मिनिटे केल्याने शरीराला चांगला स्ट्रेच मिळतो. ही एक कार्डिओ एक्सरसाईज आहे. त्यामुळे वजन नियंत्रित राहते. 

कूल डाऊन जॅपिंग

पायावर जोर देत उड्या मारणे आणि हात वर उचलणे. याचे तीन-चार सेट केल्याने बॉडी वॉर्मअप होते. स्टॅमिना वाढतो. अधिक काळ केल्याने वजन देखील कमी होते.