'या' उपायाने मूळव्याधीचा त्रास अवघ्या काही तासात होईल कमी !

पाईल्स म्हणजेच मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. अपचन, गॅस, चूकीच्या पद्धतीचा आहार, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे मूळव्याधीचा त्रास बळावतो. या त्रासाबद्दल खुलेपणाने बोलण्यास अनेकजण लाजतात. परिणामी हा त्रास अधिक गंभीर होतो. मूळव्याधीची समस्या गंभीर झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यावर उपचार केले जातात. 

Updated: May 11, 2018, 06:24 AM IST
'या' उपायाने मूळव्याधीचा त्रास अवघ्या काही तासात होईल कमी !  title=

 मुंबई : पाईल्स म्हणजेच मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. अपचन, गॅस, चूकीच्या पद्धतीचा आहार, तणावग्रस्त जीवनशैली यामुळे मूळव्याधीचा त्रास बळावतो. या त्रासाबद्दल खुलेपणाने बोलण्यास अनेकजण लाजतात. परिणामी हा त्रास अधिक गंभीर होतो. मूळव्याधीची समस्या गंभीर झाल्यानंतर शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यावर उपचार केले जातात. 

 घरगुती उपायाने मिळवा आराम -  

 अनेकदा मूळव्याधीचं दुखणं हे पोट साफ न होण्याच्या समस्येमधून वाढते. हळूहळू हा बद्धकोष्ठतेचा त्रास मूळव्याधीमध्ये बदलतो. हा त्रास गंभीर टप्प्यावर गेल्यानंतर मलविसर्जनासोबत रक्त पडणं, त्याजागी सूज जाणवणं, वेदना होणं हा त्रास बळावतो. हा त्रास होत असल्यास नीट बसणं, पाठीवर झोपणं हेदेखील त्रासदायक होतं. मग अशावेळेस वेदना, त्रास कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो. नक्की वाचा : मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करेल हा एक्सपर्ट डाएट प्लॅन

 काय आहे हा उपाय?  

 अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत करते. याकरिता अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये कापसाचा बोळा बुड्वून तो त्रास होणार्‍या जागी लावावा. यामध्ये अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि कोरफडीचा गर हे मिश्रण एकत्र करूनही लावल्यास त्रास कमी होण्यास मदत होते. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !