सुट्टीचा आनंद घेताना डाएटचं गणित कसं सांभाळाल ?

व्हेकेशनवर असताना तुम्हाला निश्चितच आरामदायक व उत्साही वाटत असते.पण या आरामासोबत तुमचे वजन देखील काही किलोने नक्कीच वाढू शकते.कारण सुट्टीवर असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाता-पिता ज्याचा परिणाम थेट तुमच्या वजनावर पडू लागतो.पण या काही सोप्या युक्ता करुन तुम्ही सुट्टीत देखील तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता.

Updated: Oct 25, 2017, 07:49 PM IST
सुट्टीचा आनंद घेताना डाएटचं गणित कसं सांभाळाल ?  title=

मुंबई : व्हेकेशनवर असताना तुम्हाला निश्चितच आरामदायक व उत्साही वाटत असते.पण या आरामासोबत तुमचे वजन देखील काही किलोने नक्कीच वाढू शकते.कारण सुट्टीवर असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाता-पिता ज्याचा परिणाम थेट तुमच्या वजनावर पडू लागतो.पण या काही सोप्या युक्ता करुन तुम्ही सुट्टीत देखील तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता.

देशभरात आउटलेट असलेल्या Prettislim या स्लीमींग अॅन्ड बॉडी-शेपींग क्लिनीक चे CMD डॉ.पुनीत नायक यांच्यामते जाणून घेऊयात सुट्टीत देखील वेट लॉस गोल्स साध्य करण्यासाठी या काही सोप्या टीप्स.

व्हेकेशनवर असताना तुमच्या जेवणाचे नियोजन कसे कराल?

इंटरनॅशनल फ्लाइटमधील फ्री अल्कोहोल तुमचे वजन वाढवू शकते.कारण या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॅलरीज वाढवत आहात हे तुमच्या लक्षातच येत नाही.वजन वाढू नये यासाठी कमी प्रमाणात मद्यपान करा.

सतत पाणी मागवा व ते थोड्या-थोड्या वेळाने नियमित प्या.

फ्लाइट मेन्युमधील सर्वच पदार्थ खाण्याची गरज नाही.हाय फॅट व हाय कार्ब असलेले पदार्थ खाणे टाळा.ज्यामध्ये कमीतकमी कॅलरीज असतील असेच पदार्थ खा.
चांगल्या पद्धतीने शिजवलेले पदार्थ खाण्यासाठी निवडा.उदा: डीप फ्राय पेक्षा ग्रील व बेक केलेले पदार्थ खा.जर तुम्ही एखादा नवीन पदार्थ खाणार असाल तर त्याआधी वेटरला तो हेल्दी आहे का हे विचारण्यासाठी संकोच बाळगू नका.

उपाशी पोटी हॉटेलमधून बाहेर पडू नका कारण त्यामुळे बाहेर तुम्ही एखादा अनहेल्ददी पदार्थ खाण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही हेवी लंच केला असेल तर रात्री हलका डिनर घेण्याचा प्रयत्न करा.
हळूहळू खाण्याने तुमचे पचन तर चांगले होतेच पण यामुळे तुम्ही कमी प्रमाणात देखील जेवता.

दिवसभर खूप चिप्स किंवा कोला असे पदार्थ घेतल्यास नेहमीपेक्षा २० टक्के कमी जेवण करा. बुफे जेवण टाळा कारण अशा जेवणामुळे तुमचे वजन वाढू शकते.
डेजर्टसाठी इतर कॅलरीज वाढवणारे पदार्थ खाण्याऐवजी फळे खा.