Diabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण, यासोबतच इतरही काही सवयी रुग्णांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात. 

Updated: Nov 26, 2022, 10:52 AM IST
Diabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?  title=
Diabetes Control Tips what to do while selecting shoes

Footwear For Diabetic Patients: मधुमेह अर्थात डायबिटीज (Diabetes ) एक असा आजार आहे, जो एकदा पाठीशी लागला की फार क्वचित प्रसंगी पाठ सोडतो. अद्यापही मधुमेहाला मुळासकट नाहीसं करणारं औषध (Medecines on Diabetes ) अस्तित्वात नाही. पण, मधुमेह झाला म्हणून जगणं तिथेच थांबतं असं नाही. कारण, आरोग्यदायी आणि योग्य ताळमेळ साधणारी जीवनशैली असल्यास तुम्ही अगदी सहजपणे या आजाराच्या नाकावर टिच्चून मनमुराद जगू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आहाराच्या सवयी काटेकोरपणे पाळायच्या आहेत आणि काही अशा सवयींचा अवलंब करायचा आहे, ज्यामुळं रक्तातीतल साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहील. (Diabetes Control Tips what to do while selecting shoes )

मधुमेह असणाऱ्यांना पायाच्या समस्या... 

जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण कमी- जास्त होऊ लागतं, तेव्हा त्याचा परिणाम शरीरातील पेशींवर होण्यास सुरुवात होते. ज्यामुळं पायांच्या समस्या भेडसावू लागतात. मधुमेह असणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये पायाला इजा होणं, तळव्यांची त्वजा रुक्ष होणं अशा समस्या जाणवू लागतात. जखम झाल्यास ती भरण्यासही जास्त वेळ जातो. यासाठीच पाय सुरक्षित ठेवण्यासाठी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी योग्य चप्पल आणि बूट निवडणं हा फायद्याचा पर्याय ठरतो. 

चप्पल आणि बूट खरेदी करताना काय लक्षात ठेवावं? (precautions while purchasing new shoes/ sandals)

- मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी पाय सुरक्षित ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळं कायम चांगल्या पद्धतीच्या चप्पल आणि बूट खरेदी करण्यालाच त्यांनी प्राधान्य द्यावं. घट्ट चप्पल अजिबातच निवडू नये. 

- लहान किंवा मोठी पादत्राणे अजिबात निवडू नयेत. घट्ट बूट किंवा चप्पल असल्यास त्यामुळं रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. 

- मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी बाजारात खास पद्धतीची पादत्राणे उपलब्ध आहेत. तरीही नवी चप्पल किंवा बूट घेताना बोटं आखडत नाहीयेत ना, दुखत नाहीयेत ना याची काळजी घ्या. 

- शू बाईट किंवा तत्त्सम इजा होणार नाहीत यासाठी धारदार काठ असलेल्या, अती उंच, खरखरीत कापडाच्या चपला निवडू नका. 

वाचा : Measles Outbreak : तुमच्या मुलांना जपा! आगामी 4 महिन्यात गोवरच्या रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

 

- मधुमेह असणाऱ्यांनी चुकूनही उंट टाचांच्या चपला निवडू नका. उंच टाचांमुळे पायांवर ताण येतो. 

- मधुमेहींनी कायमच तळव्याच्या भागात मऊ असणाऱ्या आणि वजनानं हलक्या असणाऱ्या चपला- बूट निवडावेत. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भाच्या आधारे घेण्यात आली आहे. वाचकांनी यासंदर्भातील उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )