Covid-19 New Variant : ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवट नाही; अजून एक धोकादायक व्हेरिएंट येणार

Corona in China : चीनमध्ये वाढता कोरोना पाहता, इतर देशांची चिंता देखील वाढली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी नवीन संसर्ग कोरोना व्हायरच्या म्यूटेशनसाठी (Coronavirus Mutation) मदत करू शकतो, ज्यामुळे व्हायरसचं नव रूपं दिसून येऊ शकतं.

Updated: Dec 26, 2022, 06:11 PM IST
Covid-19 New Variant : ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवट नाही; अजून एक धोकादायक व्हेरिएंट येणार title=

Covid-19 Cases Surge in China: चीनमध्ये (Covid in china) कोरोनाच्या कारणाने परिस्थिती बिकट आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, चीनमध्ये BF.7 व्हेरिएंट (Corona Varient) थैमान घालतोय, ज्यामुळे दररोज लाखो कोरोनाची प्रकरणं समोर येतायत. चीनमध्ये वाढता कोरोना पाहता, इतर देशांची चिंता देखील वाढली आहे. अशातच आता वैज्ञानिकांनी नवीन संसर्ग कोरोना व्हायरच्या म्यूटेशनसाठी (Coronavirus Mutation) मदत करू शकतो, ज्यामुळे व्हायरसचं नव रूपं दिसून येऊ शकतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे नवं म्युटेशन अधिक धोकादायक असू शकतं. जर व्हायरसचं म्युटेशन झालं तर आणखी विनाश होण्याचा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे.

अजून धोकादायक व्हेरिएंट येऊ शकतो

जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या इन्फेक्शन डिसीज एक्सपर्ट डॉ. स्टुअर्ट कैंपबेल रे (Dr. Stuart Campbell Ray) यांनी सांगितलं की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटसारखाच असू शकतो. चीनची लोकसंख्या खूप मोठी असू शकते, त्यामुळे खूप कमी लोकांमध्ये कोरोनाविरोधात इम्युनिटी तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत नवा व्हेरिएंट येण्याचा धोका होऊ शकतो.

प्रत्येक नवं इन्फेक्शन कोरोनाला म्युटेशनसाठी नवी संधी देतं. चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना अजून वेगाने पसरू शकतो. याठिकाणी झिरो-कोविड पॉलिसी जवळपास संपली आहे. जर चीनमध्ये लोकांची इम्युनिटी कमी झाली तर व्हायरल म्युटेट होण्यास अधिक मदत मिळणार आहे, असं डॉ. स्टुअर्ट यांनी सांगितलंय. 

डॉ. स्टुअर्ट यांनी पुढे सांगितलंय की, जगाच्या अनेक भागांमध्ये गेल्या सहा ते बारा महिन्यांमध्ये कोरोनाचा परिणाम सौम्य झाल्याचं दिसतंय. व्हायरस या पूर्वीपेक्षा कमी धोकादायक होता अशी गोष्ट नाही. 

20 दिवसांत 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण 

अवघ्या 20 दिवसांत चीनमध्ये 250 दशलक्षाहून अधिक (25 कोटी) लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या 20 मिनिटांच्या बैठकीतून ही माहिती लीक झाली आहे. 1 ते 20 डिसेंबर दरम्यान, 24.8 कोटी लोकांना कोविडची लागण झाल्याचेही बैठकीच्या लीक झालेल्या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. रेडिओ फ्री एशियानुसार, 20 डिसेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कोविड प्रकरणांची संख्या वास्तवापेक्षा वेगळी होती.