Covid-19: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये वाढ की घट? WHO कडून मोठा खुलासा

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Aug 26, 2022, 06:27 AM IST
Covid-19: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये वाढ की घट? WHO कडून मोठा खुलासा title=

मुंबई : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितलं की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूच्या संख्येत 15 टक्के घट झालीये, तर संसर्गाची नवीन प्रकरणे पूर्वीपेक्षा 9 टक्के कमी नोंदली गेली आहेत.

कोविड-19 ताज्या आकडेवारीनुसार WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाच्या संसर्गाची 5.3 दशलक्ष प्रकरणं समोर आली आहेत, तर 14,000 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

WHO च्या म्हणण्याप्रमाणे, पश्चिम पॅसिफिक भाग वगळता जगातील सर्व प्रदेशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची नवीन प्रकरणं कमी होतायत.

अमेरिकेत 15% घट

आफ्रिकेतील कोविडमुळे मृत्यू 183 टक्क्यांहून अधिक वाढलेत, तर युरोपमध्ये ते सुमारे एक तृतीयांश (33 टक्के) आणि अमेरिकेत 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

WHO चा इशारा

असं असूनही WHO ने इशारा दिला आहे की, कोविड-19 ची प्रकरणं पूर्णपणे नोंदवली जात नाहीयेत. कारण अनेक देशांनी त्यांची चाचणी कमी केली आहे आणि व्हायरसवर देखरेख ठेवण्यासाठी 'प्रोटोकॉल' योग्य पद्धतीने पाळले जात नाहीत.

ओमायक्रॉन व्हेरिएंटसाठी लस मंजूर

या आठवड्याच्या सुरुवातीला, फायझरने यूएस नियामक अधिकाऱ्यांना कंपनीच्या नवीन लसीला मान्यता देण्यास सांगितलंय. याच्या मदतीने ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या नवीन व्हेरिएंटपासून संरक्षण करणं शक्य आहे.