CORONA : जाणून घ्या एक MASK नेमका कधीपर्यंत वापरता येतो

दो गज की दूरी, मास्क है जरूरी   

Updated: Dec 1, 2020, 05:33 PM IST
CORONA : जाणून घ्या एक MASK नेमका कधीपर्यंत वापरता येतो title=

नवी दिल्ली : Coronavirus covid 19 कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकाधिक लोकांना संक्रमित करत आहे. कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी फार आधीपासूनच आरोग्य खातं आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून मास्कच्या वापरावर भर देण्यात आला होता. 

नियमित मास्कचा वापर करत कोरोनापासून बचाव करता येणं किमान काही अंशी सोपं होतं असं अभ्यासक आणि संशोधकांचंही मत आहे. याच धर्तीवर मागील साधारण वर्षभरापासून मास्कचा वापर संपूर्ण जगभरात झपाट्यानं वाढला. 

सिंगल लेअर Mask मास्कपासून फिल्टर, एन 95 असे विविध प्रकारचे मास्क बाजारात आले. हल्ली तर, या मास्कला फॅशनचीही जोड मिळाली. या निमित्तानं एका नव्या उद्योगानंही जन्म घेतला. असा हा सध्याच्या घडीला अतीव महत्त्वाचा मास्क कोरोनापासूनच्या युद्धात तुमची ढाल म्हणूनच भूमिका बजावतो. 

आतापर्यंत तर तुमच्याकडेही नानाविध प्रकारचे मास्क जमले असतील. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, की तुम्हाला किती कालावधीनंतर हा मास्क बदलावा लागतो? कोरोना संसर्गापासून पूर्णपणे बचाव करेल असा मास्क नेमका कोणता हे तुम्ही जाणता का? 

सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनापासून बचावासाठी सर्जिकल आणि कापडापासून तयार करण्यात आलेला मास्क सर्वाधिक फायद्याचा समजला जातो. जुना किंवा वारंवार एकच मास्क वापरणं हे हानिकारक असल्यामुळं मास्क सातत्यानं बदलणं महत्त्वाचं आहे. 

सध्या वैद्यकिय सल्ल्यानुसार तीन लेअर असणाऱा मास्क वापरणं फायद्याचं आहे. ज्यामध्ये श्वासोच्छवासास त्रास होणार नाही अशा कापडाचा वापर केलेला असतो. हे मास्क वारंवार वापरले जाऊ शकतात आणि खिशालाही परवडतात. 

 

कापड आणि सर्जिकल मास्क वापरुन वारंवार धुतल्यानंतर कापड पातळ होतं किंवा मास्क फाटतं. त्यामुळं यापासून कोरोना संसर्गाचा धोका अधिक बळावतो. तुम्हीही अधिक काळापासून एकच मास्क वारंवार धुवून त्याचाच वापर दैनंदिन जीवनात करत असाल तर, हे धोक्याचं ठरु शकतं. त्यामुळं अगदी लहान गोष्टींमधील बारकावे लक्षात घ्या आणि कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवा.