त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोथिंबरचा फेसपॅक ठरेल उपयुक्त!

आपली त्वचा नितळ, मुलायम असावी असे प्रत्येकीला वाटते.

Updated: May 15, 2018, 02:06 PM IST
त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी कोथिंबरचा फेसपॅक ठरेल उपयुक्त! title=

मुंबई : आपली त्वचा नितळ, मुलायम असावी असे प्रत्येकीला वाटते. पण ऋतुमानानुसार त्वचा बदलते आणि त्यावर आपल्याला नवे उपाय शोधावे लागतात. कोथिंबीर साधारणपणे पदार्थ सुभोभित करण्यासाठी किंवा त्याची चव, स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? की त्वचेसाठी देखील कोथिंबीर उपयुक्त आहे. कोथिंबीरचा उपयोग कोरड्या त्वचेवर देखील होतो. पिंपल्स, ब्लॅक हेडसवर कोथिंबीर हा नैसर्गिक उपाय आहे. कोरड्या त्वचेसाठी महागड्या क्रीम्स वापरण्याऐवजी हा नैसर्गिक उपाय करून बघा. तो करण्यास ही अगदी सहज सोपा असून अतिशय परिमाणकारक आहे. 
कोरड्या त्वचेसाठी कोथिंबीर फेसपॅक बनवण्याचे टप्पे:

१. ओंजळभर कोथिंबिरीची पाने घेऊन ग्राइंडर मध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा.
२. ती पेस्ट गाळून घ्या. गाळलेल्या रसात चिमूटभर हळद घाला आणि ते मिश्रण एकजीव करा. 
३. ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करा. 
४. काही वेळ पॅक चेहऱ्यावर सुकू द्या. रात्री झोपण्यापूर्वी हा पॅक लावल्यास अधिक उत्तम. 
५. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. अधिक चांगल्या फायद्यासाठी हा पॅक रोज लावा. 

याचा फायदा कशाप्रकारे होतो?

कोथिंबिरीच्या पानात हळद घातलेला फेसपॅक हा कोरड्या त्वचेसाठी परिणामकारक घरगुती उपाय आहे. त्यामुळे त्वचा स्वच्छ होवून त्वचेचे ओपन झालेले पोर्स बंद होतात. कोथिंबिरीमध्ये असलेल्या volatile oil मुळे त्वचा मॉइश्चराईज होते. 
तसंच त्वचेला अँटिऑक्सिडेंटचा भरपूर पुरवठा होतो. हळदीमुळे त्वचेवरील मोठे पोर्स लहान होण्यास मदत होते. त्याचबरोबर हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याने पिंपल्सला प्रतिबंध होतो.