अननसाच्या सेवनाने खरंच Cholesterol वाढतंय? जाणून घ्या सत्य!

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचं सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.

Updated: Sep 7, 2022, 06:32 AM IST
अननसाच्या सेवनाने खरंच Cholesterol वाढतंय? जाणून घ्या सत्य! title=

मुंबई : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचं सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. ज्यूस केवळ शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत नाही तर त्यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बहुतेक लोकांना मोसंबी आणि डाळिंबाचा रस पिणं पसंत करतात. पण हा रस जास्त गोड असल्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. 

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अननसाचा रस अधिक फायदेशीर ठरू शकतं. अननसात 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अननस हे लिंबूवर्गीय फळ असून ते चरबी कमी करण्यास देखील मदत करतं. चला जाणून घेऊया अननसामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कशी कमी होते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ज्यामध्ये अननस हा उत्तम पर्याय मानला जाऊ शकतो. 

अननसामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' मोठ्या प्रमाणात आढळतं. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यात खूप मदत करतात. अननसात भरपूर जीवनसत्त्वं, फायबर आणि प्रोटीन घटक असतात. याच्या सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं.

बंद धमन्या उघडण्यासाठी फायदेशीर

एका अहवालानुसार, अननसमध्ये आढळणारे ब्रोमेलेन रक्तातील चरबी कमी करून बंद झालेल्या धमन्या उघडण्याचंही काम करतं. उच्च कोलेस्टेरॉलमुळे स्लो ब्लड सर्कुलेशन देखील सुधारतं.