सतत लांबचा विमानप्रवास करणं ठरू शकते या 'दुर्धर आजाराचे' कारण

जगभरात फिरावं, विमानप्रवास करावा,  अशी अनेकांची इच्छा असते. मात्र कामा निमित्त किंवा हौसेपोटी अशाप्रकारे सतत लांबचा विमानप्रवास करणं आरोग्याला त्रासदायक ठरत आहे.  

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 12, 2017, 06:13 PM IST
सतत लांबचा विमानप्रवास करणं ठरू शकते या 'दुर्धर आजाराचे' कारण  title=

मुंबई : जगभरात फिरावं, विमानप्रवास करावा,  अशी अनेकांची इच्छा असते. मात्र कामा निमित्त किंवा हौसेपोटी अशाप्रकारे सतत लांबचा विमानप्रवास करणं आरोग्याला त्रासदायक ठरत आहे.  

लांबच्या विमानप्रवासामुळे जेट लेगचा त्रास वाढतो. परिणामी शरीराचे बॉडी क्लॉक बिघडते. सुरवातीच्या टप्प्यावर क्षुल्लक वाटणारी ही गोष्ट भविष्यात अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.  

काय आहे धोका ? 

एका संशोधनाच्या माहितीनुसार, शरीराचे बॉडी क्लॉक बिघडल्यास शरीरात कॅन्सर ट्युमरची वाढ होण्याचा धोका बळावतो. 

डेली मेलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, जेट लेगमुळे बॉडी क्लॉग बिघडते आणि परिणामी पेशींच्या कार्यामध्ये बिघाड होण्यास मदत होते.  

काय आहे दावा  ? 

बर्लिनच्या चॅरिटी मेडिकल युनिव्हर्सिटीच्या मुख्य लेखिका एंजेला रिलोगियो यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीराचे बॉडी क्लॉक हे बाहेरील प्रकाश आणि अंधाराच्या ताळमेळावर अवलंबून असते. त्यावर शरीराचे कार्य चालते.  

उंदरांवर केला प्रयोग 

पिएलओएस बायोलॉजी पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार , उंदरांवर आरएएस नावाच्या एका प्रोटीनच्या  कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. यानुसार उंदरांमध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ झाल्याचे लक्षात आले.  

आरएएस हे शरीराच्या आंतरिक बॉडी क्लॉकवर परिणाम करते. आईएनके 4 आणि एआरएफ या प्रोटीनमुळे शरीरात कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.