Bournvita row : अनेक पालक आपल्या मुलांना दुधात बॉर्नविटा (Bournvita) मिसळून प्यायला देतात. मुलांची उंची वाढावी, त्यांना भूक लागावी यासाठी बोर्नविटा उपयुक्त असल्याचा दावा कंपनीने केलाय. एका सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सरनं (Social Media Influencer) बॉर्नविटाचे सगळे दावा खोटे असल्याचा आरोप केलाय. त्याच्या म्हणण्युनासार 100 ग्राम बॉर्नविटात 37 ग्राम साखर असते. इतकच नाही तर बॉर्नविटात जो रंग वापरलो जातो त्यामुळे कॅन्सर (Cancer) होऊ शकतो असही त्यांचं म्हणणं आहे.
तसंच चॉकलेटचाही मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे कंपनीनं आपली टॅगलाईन बदलून तयारी विजयाची ऐवजी तयारी डायबिटीसची (Diabetes) अशी करावी अशी मागणीही या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने केलीय.
कंपनीचं जोरदार प्रत्युत्तर
दुसरीकडे कंपनीनेही या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बॉर्नविटा सकस आणि पौष्टिक आहार असून त्यात कोणतेही घातक पदार्थ नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. बॉर्नविटाध्ये विटामिन ए, सी, डी, आयरन, झिंक, कॉपर आणि सेलेनियम न्यूट्रिएंट्स असतात, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते असा दावा कंपनीने केलाय. कंपनीने तयार केलेला फॉर्म्युला 70 वर्ष जुना आहे. बॉर्नविटामध्ये 7.5 ग्राम साखरेची मात्रा मात्र साखरेचं प्रमाण मुलांच्या गरजेनुसारच असतं, यामुळे डायबिटीजसारखे आजार होत नाहीत असंही स्पष्टीकरण कंपनीने दिलंय.
200 मिलीमीटर गरम किंवा थंड दुधात बॉर्नविटा मिसळून लहान मुलांना दिलं जातं. Bournvita च्या प्रत्येक पाकिटात 7.5 ग्रॅम साखर असते. म्हणजे जवळपास दीड चमचा साखर. लहान मुलांच्या शरिराला दररोज ज्या प्रमाणात साखरेची गरज आहे त्यापेक्षा हे प्रमाण खूपच कमी असल्याचंही कंपनीने म्हटंलय. यामुळे डायबिटिस कोणतीही शक्यता नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांना 25 ग्रॅमपेक्षा अधिक साखर दिली जाऊ नये.
संशोधकांनी दावा खोडला
कंपनीने आपल्यापरीनं बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी संशोधकांना मात्र कंपनीचा दावा मान्य नाही. संशोधक आणि लिव्हर स्पेशालिस्ट डॉ. एबी फिलिप्स यांनी कंपनीच्या दाव्यावर आक्षेप नोंदवलाय. 20 ग्राम बॉर्नविटात 7 ग्राम साखर असणं रोजच्या गरजेपेक्षा 35 % जास्त असल्याचं फिलिप्स यांचं म्हणणं आहे. बॉर्नविटा प्यायल्यानं हाडं आणि पेशी मजबूत होतात, मेंदू तल्लख होतो हा दाव्यातही तथ्य नसल्याचं फिलिप्स यांनी म्हंटलंय.
बरेच पालक चांगल्या आरोग्यासाठी, उंची वाढण्यासाठी आपल्या मुलांना बॉर्नविटा देतात. कंपनीच्या जाहिरातीला भूलून पालकांचा अशा गोष्टींवरच जास्त भर पाहायला मिळतो. मात्र आता आरोग्य मंत्रालयानं फूड सप्लिमेंट्सलबाबत कडक नियमावली तयार करण्याची गरज आहे. जेणेकरून पालकांची फसवणूक टळेल आणि चिमुकल्याचं भवितव्यही सुरक्षित राहिल.