Body Detox Tips: थंडीच्या दिवसामध्ये (Winter Days) अधिकतर आपण तळलेलं आणि गरमा गरम खाणं पसंत करतो. यामध्ये पराठे, तळलेली भजी यांचा समावेश असतो. मात्र या गोष्टींच्या सेवनामुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढू लागते. अशावेळी लोकांच्या छातीत जळजळ (Heart burn), गॅस होणं (Gas) तसंच बद्धकोष्ठता या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे आपल्या शरीराला डिटॉक्स (Body Detox) करणं खूप गरजेचं असतं.
शरीर डिटॉक्स झालं की, तुमच्या शरीरातून वाईट आणि विषारी पदार्थ निघून जातात. मात्र शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, हा अनेकांच्या मनातील प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, थंडीच्या दिवसांत शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे.
तळलेलं खाणं आणि मिठाईच्या सेवनानंतर शरीराला डिटॉक्स करणं फार गरजेचं असतं. यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सलाडचा समावेश करू शकता. सलाडमध्ये तुम्ही फळं, काकडी, मूळा तसंच ब्रोकोली या पदार्खांचा वापर करू शकता. सलाडच्या सेवनाने तुमच्या शरीरात आम्ल आणि क्षारांची पीएच लेवल संतुलित राहते.
थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या भाज्याचं सेवन केलं गेलं पाहिजे, यामुळे शरीर डिटॉक्स राहण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही हिरव्या भाज्या वाफवून देखील खाऊ शकता. ब्रोकली, पालक, मशरूम, बीन्स या भाज्यांचा तुम्ही उकडवून आहारात समावेश करू शकता. या भाज्यांच्या सेवनाने शरीर डिटॉक्स राहण्यास मदत होते.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी सर्वात साधा आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. पाणी प्यायल्याने किडनीच्या माध्यमातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला दिवसातून 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं.