Blood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा

Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.

Updated: Dec 30, 2022, 03:15 PM IST
Blood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा  title=

Blood Sugar Level by Age : आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज डायबिटीज (Diabetes) हा  आजार वाढताना दिसून येत आहे. डायबिटीज डिटेक्ट झाला की हा  आजार आयुष्यभर रुग्णाची पाठ सोडत नाही. डायबिटीजच्या (Diabetes Control) रुग्णाला रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की सामान्य रक्तातील साखरेची पातळी किती आहे? तुमच्या रक्तातील शुगर पातळी कुठेतरी नॉर्मल पेक्षा जास्त आहे का? हे देखील जाणून घ्या की सामान्य रक्तातील साखरेची पातळी वयानुसार बदलते. जाणून घ्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सामान्य रक्तातील शुगर पातळी काय असावी?

मुलांमध्ये रक्तातील शुगरची नॉर्मल पातळी 

1-6 वर्षांच्या मुलांसाठी नॉर्मल रक्तातील शुगरची पातळी (Sugar Level) 110 ते 200 mg/dL पर्यंत असते. त्याचवेळी, 100 ते 180 mg/dL ही 6-12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी रक्तातील साखरेची सामान्य पातळी आहे. याशिवाय, 90 ते 150 mg/dL ही 13-19 वर्षांच्या मुलांसाठी रक्तातील साखरेची सामान्य पातळी आहे. तर, 19 वर्षांवरील लोकांसाठी, रक्तातील साखरेची सामान्य पातळी 90 ते 150 mg/dL असते.

50 पेक्षा जास्त लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी त्यांच्या रक्तातील  शुगर पातळीची (Sugar Level) विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण या वयात मधुमेह झाल्यास त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. उपवास दरम्यान, 50-60 वर्षे वयोगटातील लोकांच्या रक्तातील साखरेची नॉर्मल पातळी 90 ते 130 mg/dL असते. त्याचवेळी, दुपारच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 140 mg/dl पेक्षा कमी असेल असे मानले जाते. याशिवाय, रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 150 mg/dl पेक्षा कमी असावी.

रिकाम्या पोटी रक्तातील शुगर पातळी किती असावी?

प्रौढ व्यक्तीमध्ये रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) 70-100 mg/dl पर्यंत असते. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 100-125mg/dl दरम्यान असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. दुसरीकडे, जर रक्तातील साखरेची पातळी 126mg/dl पेक्षा जास्त असेल तर डायबिटीज (Diabetes) होण्याची शक्यता असू शकते. असे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)