Bikini Waxing in Pregnancy: प्रेग्नन्ट महिलांमध्ये शरीरावरील केसाची वाढ अधिक वेगाने होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? प्रेग्नन्सीमध्ये शरीरातील ऍस्ट्रोजन हार्मोनमधील इम्बॅलन्समुळे (estrogen in pregnancy) असं होऊ शकतं. महिला त्यांच्या या पब्लिक हेअरबाबत अत्यंत संवेदनशील असतात, प्रेग्नन्सीमध्ये नेहमीच प्यूबिक हेअर ( pregnancy and pubic hair growth ) काढणं कठीण होतं. अशात अनेक महिला प्रेग्नन्सीमध्ये थेट बिकिनी वॅक्सिंग सारखा उपाय अवलंबतात. मात्र हे बिकिनी वॅक्सिंग सेफ आहे का?( Is Bikini Waxing Safe) जाणून घेऊयात.
खरंतर बिकिनी वॅक्सिंगचे अनेक फायदे आणि सोबतच तोटे देखील आहेत.
कोणत्याही गर्भवती महिलेला अंडरआर्म्स, पोट किंवा अगदी पायांवरून केस काढणे सोपे जाते. मात्र बेबी बम्पमुळे पोटाखालील व्हजायनल भागातील केस काढणं अत्यंत कठीण होतं. अशात अनेक महिला या बिकिनी वॅक्सिंगचा पर्याय अवलंबतात. खरंतर डॉक्टरांच्या माहितीनीसार गर्भावस्थेत व्हजायनल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी पब्लिक हेअर काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अशात बिकिनी वॅक्सिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. याने त्या महिलेला पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आधीच माहिती मिळू शकते. याने महिलांना व्हजायनल भागात खाज येणं, सूज येणं किंवा युरीन पास करताना जळजळ होऊ शकते.
खरंतर, प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंग करणं सुरक्षित मानलं जातं, मात्र शेवटच्या दोन महिन्यांमध्ये असं करणं योग्य नसल्याचं डॉक्टर सांगतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि देखरेखीत बिकिनी वॅक्सिंग करावं.
bikini waxing in pregnancy safe or not know all pros and cons as per doctors guidance