योनीमार्गात कोरडेपणा जाणवतोय? काय असू शकतात यामागची कारणं...

वजायनल ड्रायनेस म्हणजे योनीमार्ग कोरडा होणं ही समस्या सामान्यपणे महिलांमध्ये आढळून येते.

Updated: Mar 3, 2022, 03:28 PM IST
योनीमार्गात कोरडेपणा जाणवतोय? काय असू शकतात यामागची कारणं... title=

मुंबई : अनेकदा तोंड, घसा किंवा त्वचा कोरडी पडण्याची समस्या जाणवते. मात्र अनेकदा महिलांना योनीमार्ग कोरडा पडण्याचीही समस्या जाणवते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वजायनल ड्रायनेस म्हणजे योनीमार्ग कोरडा होणं ही समस्या सामान्यपणे महिलांमध्ये आढळून येते. मात्र याला केवळ मेनोपॉज हे एकच कारण नसू शकतं. 

जाणून घेऊया योनीमार्ग कोरडा पडण्याची कारणं

रजोनिवृत्ती

रजोनिवृत्तीच्या काळात एस्ट्रोजन हार्मोनच्या पातळीमध्ये घट होते. यामुळे योनीमार्ग कोरडा पडण्याची शक्यता अधिक असते. याला 'वजायनल एंट्रॉफी किंवा एट्रोपिक वजिनायटिस' असंही म्हटलं जातं.

स्तनपान

बाळाला जन्म दिल्यानंतर किंवा स्तनपान करताना एस्ट्रोजन हार्मोनच्या पातळीत काही काळ घट होते. यामुळे योनीमार्ग कोरडा पडू शकतो.

हार्मोनल बर्थ कंट्रोल पिल्स

ज्या महिला कमी वयात हार्मोनल बर्थ कंट्रोल पिल्सचं सेवन करतात त्यांना देखील ही समस्या सतावू शकते.

डिहाइड्रेशन

वजायनल डिहायड्रेशनच अजून एक कारण म्हणडे पाण्याची कमतरता. त्यामुळे तज्ज्ञ नेहमी योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात.