Benefits of Yoga: वाढते प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यामुळे प्रत्येकाला आरोग्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीच्या उपचारपद्धतीकडे लोकांचा कल वाढला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योगासनांना सर्वोत्कृष्ट मानले जाते. यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सध्या अनेकजण योगासनांकडे वळताना दिसतात.
आरोग्य निरोगी ठेवण्यासोबत मनावर ताबा ठेवण्यासाठीही योगासन हा उपयोगी आहेत. योगासन करताना श्वसनक्रिया व आसन करण्याची पद्धत महत्त्वाची आहे. यांमुळे अनेक फायदे होत असून मानसिक ताणहीकमी होण्यास मदत होते. योगासनांमुळे रागावर नियंत्रण ठेवता येते तसेच रोगांपासूनही मुक्ती मिळते. दररोज किमान अर्धा तास योगासनासाठी राखून ठेवल्यास संपूर्ण आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.
जाणून घेऊयात नियमित योगा करण्यानं काय फायदे होतात.
योगाचे अनेक फायदे आहेत. पण ते अनुभवण्यासाठी योगा योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. योगाभ्यास करताना आपले पुर्ण लक्ष श्वासावर केंद्रीत करावे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची योग्य पध्दत अवलंबण खुप आवश्यक असते. योगा आपण कोणत्याही ठिकाणी करु शकतो, परंतु बाहेर योग केला तर ताजी हवा आणि उन्हाचा आनंद घेता येतो. यामुळे मेंदूला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे शक्य झाले तर निसर्गाच्या सहवासात योगा करावा.