मुंबई : आपण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करतो. मात्र तुम्हाला माहित आहे का की वजन कमी करण्यासाठी तुमच्या किचनमध्येच एक गोष्ट आहे. किचनमधील या महत्त्वाच्या पदार्थाद्वारे तुम्ही आजारांनाही दूर ठेऊ शकता. आम्ही तुम्हाला मेथीच्या दाण्यांबद्दल सांगतोय. मेथीच्या वापराने तुम्ही वजन कमी करता त्याचसोबत डायबिटीज जोखिम कमी करू शकता.
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक प्रकारचे तत्व असतात. याच्या वापराने शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. हे दाणे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण वाढण्यापासून थांबवतं. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या नियमित चहा किंवा कॉफीच्या जागी मेथीचा चहा घ्याल तर लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे आजार कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते.
मेथीचा चहा पिल्याने चयापचय क्रियेचा दर वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की मेथीचा चहाच्या सेवनाने छातीत जळजळ, एसि़डीटी आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते. मेथीमध्ये अँटासिड असतात जे शरीरात अॅसिड रिफ्लेक्सप्रमाणे कार्य करतात. याशिवाय पोटाच्या अल्सरपासूनही मुक्तता मिळते.
मेथीचा चहा बनवण्यासाठी, एक चमचा मेथीच्या दाण्यांची पूड घ्या आणि गरम पाण्यात मिसळा. यानंतर मेथीला गाळून त्या पेयामध्ये लिंबू घाला. तुम्हाला हवं असेल तर रात्री मेथी पाण्यात भिजत घाला आणि सकाळी तुळशीच्या पानांसोबत पाण्यात उकळा. चहा गाळा आणि त्यात थोडा मध घाला.