मुंबई : नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मकरसंक्रांत सण येतोय, संक्रांत अवघ्या आठवडाभर दूर आहे, गृहिणींनी तिळाचे लाडू , तीळ पापडी बनवायला घेतलीच असणार, हिवाळ्यात तीळ किती पौष्टिक आहेत आपण सारेच जाणतो. पण काही तिळाचा इतरही फायदे तुम्हाला माहित आहेत का ? चला आज जाणून घेऊया.
वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की तीळ तुमचा अनेक आजारांपासून रक्षण करते. तिळाच्या बियांमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. हृदयविकारापासून ते अनेक आजारांवर तीळाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
1 चमचा तीळ रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवून सकाळी गुळासोबत खावी. यामुळे मासिक पाळीची समस्या दूर होईल.
तिळामध्ये कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि सेलेनियम इत्यादी हृदयासाठी फायदेशीर असतात. तसेच जेवण तयार करताना तिळाच्या तेलाचा वापर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्वचेसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व तिळात आढळून येतात. शरीराच्या एखाद्या ठिकाणी भाजल्यावर तीळ बारीक करून तूप आणि कापूर यांची तयार पेस्ट जखमेवर लावल्याने आराम मिळतो.
कोलन कॅन्सर
तीळाच्या अतिसेवनामुळे पोटातील आतड्यांचे नुकसान होऊ शकते. अधिक प्रमाणात तीळ खाल्ल्यास पोटात आग होते. काहीवेळेस याचा गंभीर परिणाम होऊन कॅन्सरचा धोका संभावतो.
वजन वाढतं
तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर तीळाचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. अतिप्रमाणात तीळ आहारात असल्यास वजन वाढू शकते. तीळामध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज,सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे वजन वाढते.