गुणकारी कांदा; जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

जाणून घ्या काय आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

Updated: Aug 11, 2020, 05:11 PM IST
गुणकारी कांदा; जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे... title=
संग्रहित फोटो

मुंबई : स्वयंपाकघरातला कांदा (Onion) आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना असल्याचं मानलं जातं. जेवणात नेहमीच कांद्याचा वापर केला जातो. पण जेवणात शिजवलेला कांदा खाण्याहून कच्चा कांदा खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. कच्च्या कांद्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो. जाणून घ्या काय आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे Benefits Of Eating Raw Onion -

ब्लड प्रेशर -

ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासाठी अनेक गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात कच्च्या कांद्याचाही समावेश आहे. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्यांना, रोज एक कच्चा कांदा खाणं फायदेशीर ठरु शकतं. यामुळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होऊ शकते. कच्च्या कांदा रोजच्या जेवणात सलाड म्हणूनही सेवन करु शकता. 

कॅन्सरशी लढण्यात फायदेशीर -

कांद्यामुळे कॅन्सर बरा होतो असं बोलणं चुकीचं ठरेल. परंतु कांद्यामध्ये असे काही तत्व असतात जे कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे कॅन्सरग्रस्त व्यक्तीने दररोज कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने, कॅन्सरशी लढण्यात मदत होऊ शकते.

हाडांसाठी लाभदायक 

नियमितपणे कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. 

डायबिटीज 

कांद्यामध्ये असणारे एन्टी डायबेटिक गुण डायबिटीज होण्यापासून बचाव करु शकतात.

पचनक्रिया 

पचनक्रिया सुधारण्यासाठी, उत्तम राखण्यासाठी कच्चा कांदा खाणं खूप फायदेशीर ठरतं.

कांद्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात, अनेक तत्व असतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. कच्चा कांदा खाल्याने शरीरात व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरीरातील व्हिटॅमिन सी फायदेशीर ठरतं.