Sexual Health : लैंगिक आरोग्यासाठी कॉफी फायदेशीर? बघा काय सांगते संशोधन...

Coffee Benefits for Sexual Health : नवीन संशोधनानुसार शारीरिक संबंध ठेवण्याआधी एक कप कॉफी घेण्याचे काय फायदे होतात, याविषयी माहिती समोर आली आहे. कॉफीच्या सेवनामुळे सेक्स ड्राइव्ह वाढवण्यास मदत होते.

Updated: Jan 20, 2023, 11:57 AM IST
Sexual Health : लैंगिक आरोग्यासाठी कॉफी फायदेशीर? बघा काय सांगते संशोधन... title=

Coffee for Physical Relationship: बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात वाफळलेल्या मस्त गरमा गरम कॉफीने (Coffee) होते. सकाळची वेळ असो की संध्याकाळची कधीही कंटाळा आल्यास मूड रिफ्रेश करायचा असेल अनेक जण कॉफीचे सेवन करतात. एकांत असो की गेट टू गेदर कॉफी नेहमीच सोबतीला असते. कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. यांनंतर आता संशोधकांनी कॉफीच्या सेवनाबाबत नवीन संशोधन केले आहे. Sex करण्याआधी एक कप कॉफी घेतल्यास याचे जबरदस्त फायदे होतील, असा दावा संशोधकांनी केला आहे (Coffee for Physical Relationship)

बहुतेकजण दिवसातून किमान दोन ते तीन वेळा कॉफी सेवन करतात. कॉफी घेतल्यावर मूड रिफ्रेश होते. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होते. यामुळेच अनेकजण कामाचा तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफी पितात. तर, अनेक जण जीममध्ये जाण्याआधी किंवा वर्क आऊट करण्याआधी एक कप कॉफी आवर्जून घेतात. यामुळे व्यायाम करताना वेगळीच एनर्जी मिळते. मात्र, आता नवीन संशोधनानुसार  Sex करण्याआधी एक कप कॉफी घेण्याचे काय फायदे होतात याविषयी माहिती समोर आली आहे. कॉफीच्या सेवनामुळे सेक्स ड्राइव्ह वाढवण्यास मदत होते. 

नपुसंकतेचा (इरेक्टाइल डिसफंक्शन) धोका कमी होतो

जे पुरुष दिवसातून किमान एकदा कॉफी पितात त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता कमी असते. सेक्स करण्यापूर्वी योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास ते व्हायग्रा म्हणून काम करू शकते. मात्र, हे तितके प्रभावी नाही. जे पुरुष दररोज 85 ते 170 मिलीग्राम कॅफिनचे सेवन करतात त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शनचे धोका 42 टक्क्यांनी कमी होतो असेही नविन संशोधनातून दिसून आले.

कॅफिनमुळे स्टॅमिना वाढतो

कॉफी ही झटपट ऊर्जा वाढवणारे पेय आहे. बरेचजण प्री-वर्कआउट सप्लिमेंट म्हणून कॉफीचे सेवन करतात. कॅफिनमुळे तुमचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. यामुळे याचा फायदा Physical Relation बनवताना होऊ शकतो. 

लैंगिक इच्छा वाढते

कॉफीमध्ये आढळणाऱ्या सुगंधामुळे पुरुषांचा ताण आणि तणाव कमी होतो. कॉफीच्या सुगंधामुळे मूड देखील रिफ्रेश होतो. कॉफीच्या सेवनामुळे पुरुषांची लैंगिक इच्छा वाढते. 

कॉफीचे अतीसेवन आरोग्यास हानीकारक

कॉफीचे अतीसेवन आरोग्यास हानीकारक ठरू शकते. तज्ञांच्या मते, एका दिवसात 3 कप पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने तुम्हाला रात्री झोप येत नाही. यामुळे निद्रानाशाची समस्या निर्माण होऊ शकते.