Benefits of amla : उन्हाळ्यात रोज फक्त एक आवळा खाण्याचे हे आहेत मोठे फायदे

आवळा खाण्याचे मोठे फायदे आहेत. जाणून घ्या त्याचे फायदे

Updated: Apr 29, 2022, 07:16 PM IST
Benefits of amla : उन्हाळ्यात रोज फक्त एक आवळा खाण्याचे हे आहेत मोठे फायदे title=

Benefits of amla in Summer : कोरोनाच्या साथीने आपल्या सर्वांना आरोग्याचे महत्त्व शिकवले आहे. आता बहुतेक लोक आरोग्य आणि फिटनेसबद्दल सावध झाले आहेत. आयुर्वेदातील गोष्टी आता अधिक लोकप्रिय झाले आहेत. यापैकी एक म्हणजे आवळा. आवळा, लोणचे किंवा ज्यूस असो, हे फळ अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, ज्यात वात, पित्त, कफ असे तिन्ही शारीरिक दोष दूर करण्याची क्षमता आहे. चला तर मग जाणून घेऊया रोज आवळा खाणे का महत्त्वाचे आहे?

रोज आवळा का खावा?

आवळा याला संस्कृतमध्ये अमलाकी म्हणतात, ज्याचा अर्थ जीवनाचा अमृत असा होतो. आवळ्यामध्ये असलेले घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे, पचन सुधारण्यासाठी, चयापचय आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्याचे काम करतात. आवळा व्हिटॅमिन-सी, फायबर आणि मिनरल्स यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. आवळ्यामध्ये संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांपेक्षा 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते, जे मुक्त रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करते आणि पेशींच्या पुनरुत्पादनास मदत करते.

आवळा रोज खाल्ल्याने वंध्यत्व, पचन समस्या, सर्दी, खोकला आणि ऍलर्जी यांसारखे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत, अशा प्रकारे आवळा किंवा त्याचा रस खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होऊ शकतात.

आवळा रोज किती आणि का खावा?

तज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीने 75-90 मिलीग्राम आवळ्याचे सेवन केले पाहिजे. 100 ग्रॅम आवळ्यामध्ये 300 मिलीग्राम व्हिटॅमिन-सी, आहारातील फायबर, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. आवळा रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, वृद्धत्वाशी निगडीत जोखीम कमी होते आणि त्यात असलेले व्हिटॅमिन-ए डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

तुमच्या रोजच्या आहारात आवळा कसा समाविष्ट करावा?

आवळ्याच्या गोड, आंबट आणि तुरट चवीमुळे कच्चा खाण्यास त्रास होतो. मात्र, ते कच्चे किंवा उन्हात वाळवून खाण्याचे मोठे फायदे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हात वाळवलेला आवळा पोषक तत्वांनी भरलेला असतो, जो तुम्ही कधीही खाऊ शकता.