Smelly Armpits: Underarms मधून दुर्गंधी येतेय? घरच्या घरीच तयार करा Deodorant

Smelly Underarms : तुम्हाला माहितीये का? तुम्ही Deodorant घरीच तयार करु शकता, जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे  

Updated: Dec 6, 2022, 01:38 PM IST
Smelly Armpits: Underarms मधून दुर्गंधी येतेय? घरच्या घरीच तयार करा Deodorant title=
Beauty Benefits Bad smell coming from underarms Make Deodorant at home lifestyle updates nz

How To Get Rid of Smelly Underarms : लोक नेहमीच घरातून बाहेर पडताना Deodorant वापरतात. कारण हवामान कोणतंही असो पण लोकांना घाम येतोच. काही लोकांना तर हिवाळ्यात देखील घाम (Sweat) येतो. आपल्या शरीरात जे ऍसिड (Acid) आहे ते घामास्वरुपात शरीराबाहेर पडते आणि त्यामुळेच शरीरातील घामामुळे दुर्गंधी येते. तुम्हाला माहितच असेल की बाजारात असे अनेक डिओडोरंट आहेत ज्यामुळे या समस्येचे निराकरण होऊ शकते, पण जर तुम्हाला ही समस्या मुळापासून दूर करायची असेल तर तुम्ही घरच्या घरीच अंडरआर्म्ससाठी (Underarms) डिओडोरंट बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला आपण घरी अंडरआर्म्ससाठी डिओडोरंट कसे बनवू शकता त्याची प्रक्रिया आणि फायदे जाणून घेणार आहोत. 

1. लैव्हेंडर डिओडोरंट (Lavender deodorant)

साहित्य

1 कप ग्रीन टी पाणी
5 थेंब लैव्हेंडर तेल
1 कप गुलाब पाणी

प्रक्रिया

गुलाबाच्या पाकळ्या 1 रात्र पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी या पाण्यात ग्रीन टीचे पाणी टाका. नंतर त्यात लॅव्हेंडर आवश्यक तेलाचे (Lavender Essential Oil) 5 थेंब घाला. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा आणि नंतर ते तुमच्या हाताखाली वापरा. तुम्ही हे घरगुती डिओडोरंट दिवसातून 1 ते 2 वेळा वापरल्यास तुमच्या अंडरआर्म्सला दुर्गंधी येणार नाही.

2. बेकिंग सोडा डिओडोरंट (Baking soda deodorant)

साहित्य

1 टीस्पून बेकिंग सोडा
1 टेबलस्पून लिंबाचा रस
1 टेबलस्पून एलोवेरा जेल
1/2 कप पाणी

प्रक्रिया

1/2 कप पाण्यात बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा. नंतर त्यात लिंबाचा रस मिसळा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लिंबाची साल उकळून आणि पाणी गाळूनही वापरू शकता. नंतर या मिश्रणात एलोवेरा जेल घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. आता एका स्प्रे बाटलीत ठेवा आणि नंतर हे डिओडोरंट अंडरआर्म्समध्ये वापरा.

3. कॉर्न स्टार्च डिओडोरंट (Corn Starch Deodorant)

साहित्य

1 कप कॉर्न स्टार्च
5 थेंब चंदन तेल

प्रक्रिया

तुम्हाला बाजारात कॉर्न स्टार्च मिळेल, ते पाण्यात विरघळवून पातळ मिश्रण तयार करावे लागेल. या द्रावणात चंदनाचे तेल घालून स्प्रे बाटलीत मिश्रण भरा. नंतर हे मिश्रण तुमच्या अंडरआर्म्समध्ये वापरा. यामुळे तुम्हाला दोन फायदे होतील. पहिली म्हणजे अंडरआर्म्समधून वास येणार नाही आणि दुसरी म्हणजे या मिश्रणाचा वापर केल्याने अंडरआर्म्सचा काळेपणा कमी होतो.

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)