मुंबई: सध्या वर्क फ्रॉम होम कोरोना काळात सुरू आहे. त्यामुळे अनेक तास बसून काम करावं लागतात. त्यामुळे बऱ्याचदा बॅकपेनचा त्रास उद्भवू शकतो. काम करताना खूपवेळा वरखाली उठबस होते. त्यामुळे देखील कंबरदुखी जाणवते.
खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे पाठ आणि कंबर दुखण्याच्या समस्या उद्भवतात. अनेक वेळा पाठदुखीचा त्रास इतका वाढतो की उठणे-बसणेही कठीण होते. जर तुम्हीही पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर हे सोपे घरगुती उपाय करा. पाठदुखीच्या समस्येत ते आराम देतील.
हळदीचं दूध- कंबरदुखी आणि अंगदुखीची समस्या जाणवत असेल तर एक ग्लास कोमट दुधात हळद आणि मध टाकून प्या. यामुळे पाठदुखी, अंगदुखी आणि सर्दी आणि फ्लूमध्ये आराम मिळेल.
आल्याचा चहा- आल्याचे सेवन आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. सर्दी-फ्लू व्यतिरिक्त, आल्याचा चहा तुम्हाला पाठदुखीच्या समस्येत आराम देऊ शकतो.
नारळाचं तेल- खोबरेल तेलामध्ये जेवण तयार करा. खोबरेल तेलात कापूर टाकून त्याने मजास केला तर त्याचा फायदा होतो. त्यामुळे कंबरदुखी आणि अंगदुखीच्या समस्येत आराम मिळेल.
सूचना: या बातमीमध्ये दिलेले घरगुती उपचार सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)