मुंबई : देशात भलेही कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली असली तरीही कोरोनाचा अजूनही पूर्णपणे नायनाट झालेला नाही. कोरोनाच्या ओमायक्रॉनचा प्रभाव कमी होत असताना त्याचा सब व्हेरिएंट BA.2 आता अनेक देशांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसोबच अनेक संस्थानी धोक्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आता फुफ्फुसं नाही तर घशावर परिणाम करत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये श्वसननलिका आणि श्वसन प्रणाली यांच्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट दबक्या पावलांनी पुन्हा एकदा पसरण्याच्या तयारीत आहे. कोरोनाचा व्हेरिएंट जितक्या जलद गतीने बदलतोय, तितक्याच वेगाने त्याच्या लक्षणांमध्येही बदल होताना दिसतोय. ताप, खोकला, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणं या लक्षणांव्यतिरीक्त आता अनेक वेगळी लक्षणंही दिसून येऊ लागली आहेत. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता अजूनच वाढली आहे.
कोरोनाचा सब व्हेरिएंट BA.2 हा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटच्या एकत्रित येण्याने तयार झाला आहे. हा व्हेरिएंट पूर्वीच्या व्हेरिएंटच्या मानाने अधिक संक्रामक आणि वेगाने पसरला जाणार असल्याचं मानलं जातंय. या व्हेरिएंटच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये फुफ्फुसांसंदर्भातील लक्षणं दिसून येत नाहीत. तसंच आता BA.2 च्या व्हेरिएंटची दोन अजून लक्षणं समोर आली आहेत. यामध्ये चक्कर येणं आणि थकवा यांचा समावेश आहे.
संशोधकांनी कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या कान, नाक आणि घशाशी संबंधित तक्रारी जाणून घेतल्या. यामध्ये अधिकतर रूग्णांना घशाला सूज आल्याचं दिसून आलं होतं. सामन्य घसा खवखवण्यापेक्षा ही समस्या वेगळी होती. जर असा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.