मुंबई : देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट पीकवर पोहोचली आहे. दरम्यान कोरोनाची ही लाट शेवटची नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाची अशी लाट पुढच्या काळातही येऊ शकते. अशा कठीण काळाच तुमची रोग प्रतिकारशक्तीच तुम्हाला या महामारीपासून वाचवण्यास मदत करू शकते.
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती केवळ एका दिवसात मजबूत होऊ शकत नाही. यासाठी जीवनशैलीत सुधारणा, आहारात बदल आणि योगासनं करणं आवश्यक आहे. दरम्यान रोगप्रतिकारक शक्तीसाठी वाढवण्यासाठी तुम्ही या खास 5 पद्धतींचा वापर करू शकता.
च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं मानलं गेलंय. च्यवनप्राश तयार करण्यासाठी विविध औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधासोबत च्यवनप्राशचं सेवन करू शकता. शिवाय च्यवनप्राश गरम पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
चहा पिण्याची आवड अनेकांना असते. चहाच्या पानामध्ये कॅफेन असतं, जे शरीराला हानी पोहोचवतं. अशा परिस्थितीत जर तुम्ही चहाला पर्याय म्हणून हर्बल चहा पिऊ शकता. हर्बल चहा बनवण्यासाठी विविध औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर केला जातो. यात अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, ज्यामुळे जळजळ, सर्दी आणि फ्लूपासून आराम मिळतो.
हळदमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. याचं कारण हळदीतील घटक जखम लवकर भरून काढण्याचं काम करतात. हे घटक शरीरात प्रवेश केलेल्या व्हायरसलाही मारण्याचं काम करतात. त्यामुळे रोज रात्री एक ग्लास दुधात एक चमचा हळद मिसळून प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
कोणताही व्हायरस प्रथम फुफ्फुसावर हल्ला करतो. यामुळे श्वसनसंस्था काम करणं बंद करते. यासाठीच आपलं फुफ्फुसांचं कार्य मजबूत करण्यासाठी आपण प्राणायाम, कपालभाती किंवा भस्त्रिका प्राणायाम नियमितपणे करणं गरजेचं आहे.
नस्य थेरपी ही Immunity Power वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. याद्वारे खोबरेल तेल, तिळाचं तेल किंवा तूप यांचे काही थेंब नाकात टाकले जातात. असं केल्याने नाकातून शरीरात जाणाऱ्या कोरोनासारखा व्हायरस रोखण्यात मदत होते. नाकात तूप किंवा तेलाचे 2 थेंब टाकल्यानंतर काही मिनिटं झोपावं. या थेरपीने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.
((या गोष्टींचा झी 24 तास दावा करत नाही. या गोष्टी अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा))