Health alert: जेवताना सलाडमध्ये चुकूनही खाऊ नका काकडी, कारण...

अनेकदा आपण जेवणासोबतही काकडीचं सेवन करतो. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लंच किंवा डीनरमध्ये काकडीचं सेवन करू नये.

Updated: Nov 27, 2022, 05:16 PM IST
Health alert: जेवताना सलाडमध्ये चुकूनही खाऊ नका काकडी, कारण... title=

Avoid Cucumber With Meal: काकडी (Cucumber) एक पदार्थ आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी (Water) असतं, आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर (Fiber) असतं, त्यामुळे दीर्घकाळ तुमचं पोट भरलेलं राहतं. अनेकदा आपण जेवणासोबतही काकडीचं सेवन करतो. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लंच किंवा डीनरमध्ये काकडीचं सेवन करू नये.

आयुर्वेद डॉ अलका विजयन यांनी नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम के एक पोस्ट लिहिलीये, यामध्ये त्यांनी त्या रूग्णांना जेवणादरम्यान काकडी न खाण्याचा सल्ला देतात. 

लंच किंवा डीनरसोबत का खाऊ नये काकडी?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जेव्हा आपण कच्ची काकडी शिजलेल्या अन्नासोबत मिसळली तर पचर प्रक्रियेत उशीर होतो. याचं कारण म्हणजे, शिजवलेलं आणि कच्चे अन्न पचण्यासाठी शरीराला लागणारा वेळ वेगळा असतो. शिजवलेलं अन्न उष्णतेच्या प्रभावामुळे बदललेलं असतं. ज्यामुळे अमा (Ama means toxin or undigested metabolic waste) नावाची प्रो-इंफ्लामेटरी उत्पादने बाहेर पडतात. अमा म्हणजे आपल्या शरीरातील वेदनांचा घटक असतो, तो जळजळ होण्याची स्थिती निर्माण करतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी काकडी ही उत्तम मानली जाते. याचं कारण म्हणजे त्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असतं. काकडीतील बिया बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. शिजवलेल्या अन्नासोबत काकडी खाल्ल्याने काही लोकांमध्ये कुकुर्बिटासिन (Class of Biochemical Compounds) नावाच्या संयुगामुळे अपचन होतं. 

काकडीमध्ये पोषक घटक 

काकडीमध्ये सुमारे 95% पाण्याचा अंश असतो. सोबतच काकडीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅग्नीज घटक असतात. 

काकडीवर लगेच जेव्हा पाणी प्यायले जाते तेव्हा या पोषक घटकांचा शरीराला फायदा होत नाही. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक शोषले न गेल्याने त्याचे सेवन निष्फळ ठरते.