ऑस्ट्रेलिया : मुंबई : काही दिवसांपूर्वीच 102 नॉट आऊट हा चित्रपट रीलीज झाला आहे. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे दोघं या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये झळकले आहेत. या चित्रपटात वयाच्या 102 व्या वर्षीदेखील जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देण्यात आला आहे. पण वास्तवात अनेकजण लहान सहान कारणांवरून जीवन संपवण्याचा निर्णय घेत आहेत. भारतामध्ये सध्या इच्छामरण मिळावे याकरितादेखील प्रयत्न केले जात आहेत.
ऑस्ट्रेलियामधील 104 वर्षांचे डेविल गुडाल यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे. डेविड यांना कोणताही गंभीर आजार नाही. मात्र त्यांची जगण्याची इच्छा संपल्याने त्यांनी इच्छामरण स्वीकारण्याचे ठरवले आहे. भारतामध्ये 'या' वृद्धदाम्पत्याला हवंय इच्छामरण
ऑस्ट्रेलियातील डेविड हे सर्वात वृद्ध वैज्ञानिक आहेत. सध्या ते ऑस्ट्रेलियाहून स्वीझरलॅन्डला रवाना झाले आहेत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिवारातील काही सदस्यांसोबतच मित्रमंडळीही पोहचली आहे. स्विझरलॅन्डला पोहचण्यापूर्वी ते फ्रान्समध्ये काही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणार आहेत. 10 मे रोजी त्यांना इच्छामरण देण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियातून जाताना डॉ. डेविड यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, " माझं माझ्या देशावर खूप आहे. परंतू माझ्या देशात इच्छामरणाला परवानगी नाही. त्यामुळे मला स्वित्झर्लंडला जावं लागणार आहे. 'या' देशांमध्ये इच्छामरणाला परवानगी आहे.
ज्या रुग्णांच्या बिघडलेल्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची कोणतीच शक्यता नसते त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले जाते. हा सपोर्ट हटवल्यास त्या रूग्णाचा मृत्यू अटळ असतो. या अशा स्थितीत रुग्णाला इच्छामरणाची परवानगी दिली जाते. त्याला पॅसिव्ह युथनेशिया म्हणतात.