आता मुंग्या शोधू शकणार तुमच्या शरीरातील कॅन्सर पेशी; कसं ते वाचा...

नुकत्याच केलेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे.

Updated: Mar 10, 2022, 04:02 PM IST
आता मुंग्या शोधू शकणार तुमच्या शरीरातील कॅन्सर पेशी; कसं ते वाचा... title=

मुंबई : एखाद्या आजाराचं निदान करण्यासाठी काय केलं पाहिजे. तुमच्यापैकी अनेकांचं उत्तर असेल ते म्हणजे, चाचणी केल्यावर आजाराचं निदान होण्यास मदत होते. मात्र तुम्हाला माहितीये का एक छोटी मुंगी देखील तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशींना ओळखू शकतात. तुम्हाला हे खोटं वाटेल...मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनात असं समोर आलंय की, मुंगी वासाने तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या सेल्सचा शोध लावू शकते.

कॅन्सरच्या पेशी शोधण्यासाठी मुंग्या सक्षम

फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफीक रिसर्चने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये नमूद केल्यानंतर, काही काळाच्या प्रशिक्षणानंतर जे किटक दैनंदिन जीवनात गंधाचा उपयोग करतात, ते माणसांच्या शरीरातील निरोगी पेशींपासून कॅन्सरग्रस्त पेशींचा शोध लावू शकतात.

या संशोधकांनी गेल्या महिन्यात आयसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये म्हटलं होतं की, "आम्ही काढलेल्या निष्कर्षांनुसार असं दिसून आलं आहे की, मानवी कॅन्सरच्या बायोमार्करचा शोध घेण्यासाठी जीवंत गोष्टींच्या रूपात मुंग्यांचा वापर करणं इतर जनावरांच्या तुलनेत फायदेशीर आहे."

मुंग्या कशा पद्धतीने शोधतात कॅन्सरच्या पेशी

संशोधकांनी एका शुगर सोल्युशनच्या गंध आणि मुंगी यांचं परिक्षण केलं गेलं. काही मुंग्या त्यया गंधाजवळ गेल्या. यासाठी त्या मुंग्यांना ट्रेन करण्यात आलं होतं. या मुंग्या दोन वेगवेगळ्या कॅन्सर पेशींमधील अंतर जाणून घेण्यास सक्षम होत्या.

संशोधकांच्या मताप्रमाणे, मुंग्या या विविध गंध ओळखू शकतात. जसं की, नशेचे पदार्थ, विस्फोटक पदार्थ किंवा काही आजार. श्वानांप्रमाणे त्यांची गंध घेण्याची क्षमता उत्तम असते.