Milk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता

How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.  

Updated: Jun 7, 2023, 05:08 PM IST
Milk Adulteration |  तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता title=
How to Check Adulteration in Milk

Milk Adulteration News In Marathi : आपल्या घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना दूध लागतं. यामध्ये पण काहीजण नुसतं पिण्यासाठी तर कुणाला चहा, कॉफी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी दूध लागतं असते. पण दुधाचा वापर प्रत्येक घरात रोज होतो, हे निश्चित. शहरात राहणारे लोक दररोज दूध खरेदी करतात. 

अशा वेळी तुम्हाला माहिती आहे का? सध्या बनावट आणि भेसळयुक्त दुधाचा धंदा सातत्याने वाढत आहे, जो अत्यंत शरीरासाठी घातक आहे. आपल्या घरी येणारे दूध कितपत शुद्ध आहे? याची तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया भेसळयुक्त दूध कशाप्रकारे ओळखायचे...

बनावट आणि भेसळयुक्त दूध पिणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. भेसळयुक्त दूध प्यायल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. भेसळयुक्त दूध प्यायल्याने हाडे कमकुवत होतात आणि रसायनांमुळे आतडे आणि यकृताचे नुकसान होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

भेसळयुक्त दूध कडू असते

दुधाला स्वतःची चव असते आणि खऱ्या दुधाची चव हलकी गोड असते, तर बनावट दुधात डिटर्जंट आणि सोडा मिसळला जातो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भेसळयुक्त दुधाची चव कडू लागते.

डिटर्जंट दूधात जास्त फेस दिसतो 

दुधाला फेस येणे जरी सामान्य असले तरी जर दुधात डिटर्जंट मिसळले तर ते सामान्यपेक्षा जास्त फेस तयार करते. डिटर्जंट ओळखण्यासाठी काचेच्या कुपीमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये 5-10 मिली दूध घ्या आणि थोडावेळ हलवा, जेव्हा फेस तयार होईल आणि तो बराच काळ स्थिर राहील, तेव्हा त्यात डिटर्जंट मिसळले जाऊ शकते. 

रंगावरुन खरे आणि भेसळयुक्त दूध ओळखा 

खरे आणि बनावट दूध रंगावरूनही ओळखता येते. शुद्ध दुधाचा रंग साठवल्यानंतर त्याचा रंद बदलत नाही आणि पांढराच राहतो, तर बनावट दूध हळूहळू पिवळे होऊ लागते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय खऱ्या दुधाचा रंग उकळल्यानंतरही बदलत नाही, तर खोटे दूध उकळल्यानंतर फिके पडू लागते.

पाणी मिसळलेले दूध कसे ओळखावे?

दुधात केमिकल मिसळण्याबरोबरच पाणी मिसळण्याची समस्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. हे तपासण्यासाठी प्रथम लाकडावर किंवा दगडावर दुधाचे 2-4 थेंब टाका. जेव्हा दूध एका भांड्यात सहज वाहू लागले तर समजावे की त्या पाणी मिसळले आहे, तर खरे दूध हळूहळू वाहू लागते आणि त्यावर पांढरे डाग पडतात. 

दुधातील भेसळ कशी तपासावी?

  1. एका टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा दूध घाला किंवा टेस्ट  ट्यूब उपलब्ध नसल्याच काचेची वाटी किंवा ग्लास घेऊ शकता.
  2. यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तुरीची डाळ घाला.
  3. हे मिश्रण पद्धतशीरपणे एकत्र करा. 
  4. ५ मिनिटांनंतर टेस्ट ट्यूबमध्ये लाल लिटमस पेपर टाका.
  5. अर्ध्या मिनिटानंतर पेपर बाहेर काढा.
  6. लाल लिटमस पेपरचा रंग बदलला असेल, म्हणजेच रंग निळा झाला असेल, तर दुधात युरिया मिसळला आहे.