मुंबई : वाढतं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जीम, डाएट, व्यायाम, योगा असे अनेक पर्याय आहेत. मात्र अनेक प्रयत्नानंतरही पोटाजवळील चरबी घटवणं कठीण आहे. महागडे जीम किंवा कठोर डाएटपेक्षा वजन घटवण्यासाठी भारतीय मसाल्याच्या डब्ब्यातील एक पदार्थ फायदेशीर ठरणार आहे. मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. मग पहा अवघ्या 15 दिवसात वजन घटवायला कोण करेल तुमची मदत?
पचनाचे त्रास दूर करण्यासाठी, पदार्थांना तिखट चव देण्यासाठी ओवा मदत करतो. गॅस, बद्धकोष्ठता,पित्त या आजारांप्रमाणेच वजन घटवण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो.
वजन घटवण्यासाठी ओवाचं पाणी फायदेशीर आहे. नियमित सकाळी दिवसाची सुरूवात ओव्याच्या पाण्याने केल्यास शरीरातील चरबी मदत करते. ओव्याच्या पाण्यामुळे शरीरात मेटॅबॉलिझमचं कार्य सुधारते. शरीरातील कार्ब्स, चरबी, फॅट्स यामुळे होणारा धोकादायक परिणाम आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
ओव्याचं पाणी बनवण्यासाठी 50 ग्राम ओवा ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी हे पाणी गाळून त्या पाण्यात अर्धा लिंबू पिळा.
हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणं अतिशय फायदेशीर आहे. नियमित या पाण्याचे सेवन केल्यास 15 दिवसात वजन घटवण्यास मदत होते.