मुंबई : बदलची जिवनशैली, प्रदूषण, धावपण यामुळे लोकं वेळेआधीच म्हातारे दिसू लागले आहेत. कमी वयातच चेहऱ्यावर काळे डाद, मुरूम दिसू लागतात. अशावेळी नियमित योगामुळे सुंदर, उजळत्या त्वचेसोबत आकर्षक शरीर मिळण्याचा विश्वास योगाभ्यसकांनी व्यक्त केलायं. भारतीय आयुर्वेदिक योगा पद्धतीच्यया साधारण आसनांमूळे आंतरिक आणि बाहरी सौंदर्य सहजतेने मिळू शकते. रोज अर्धा तास सुर्यनमस्कार, प्राणायम, उत्थान आसन, कपाल भाती, धनुर आसन हे आपल सौंदर्य वाढवतात.
केस तसेच त्वचेच्या सौंदर्यासाठी प्राणायम महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे तणाव कमी होऊन शरीरात प्राण वायुचा प्रभावी वावर होतो. केस सफेद होणे किंवा केस गळण्याच्या समस्येतून प्राणायममूळे सुटका होत असल्याचे शहनाज हुसैन सांगतात.
उत्थान आसन सलग केल्याने मुरूम, काळे डाग अशा समस्यांवर कायमचा उपाय होऊ शकतो. कपालभारतीमूळे शरीरातील कार्बन डाय ऑक्साइड हटून रक्त स्वच्छ व्हायला मदत होते.
धनुरासनामूळे शरीरातील रक्तप्रवाह वाढल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. शरीरातील त्वचेत प्राकृतिक चमक येऊन त्वचेचा रंग उजळतो.
योगासनामूळे थकव्यापासून मुक्ती मिळते. शरीरातून उर्जेचा संचार प्रभावी होते. सूर्यनमस्काराने शरीरात नवयौवन संचारते. सूर्यनमस्कारमूळे वाढत्या वयाचा प्रभाव रोखला जाऊ शकतो.