दह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य

दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. 

Updated: Jul 25, 2022, 06:40 PM IST
दह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य title=

Beauty tips : दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे. तुम्ही दह्याचा वापर आपलं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता. कसा ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दही हा पदार्थ आपल्या घरी असतोच असतो पण जेवणाव्यतिरिक्त दह्याचे अनेक फायदे आहेत .सौंदर्य खुलवण्यामध्ये तर दह्याचे खूप उपयोग होतो. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि झिंक तुमचा स्किन एक टोन लाईट करण्यासोबत डाग कमी करण्यास मदत करतात. दही वापरून काही फेसपॅक बनवू शकतो ज्यामुळे आपली स्किन खूप तजेलदार आणि उजळ दिसू शकते.

दही त्वचेला हळुवारपणे एक्सफोलिएट करते, त्वचेवर असलेले डेड सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करते. त्वचेला फ्रेश लूक देतं. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड आणि झिंक तुमचा स्किन टोन लाईट करण्यासोबत डाग कमी करण्यास मदत करतात. दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. 

दही आणि मध

दही आणि मध यांचे मिश्रण त्वचेला आतून पोषण देईल आणि ती मऊ, सॉफ्ट  आणि हायड्रेटेड राहील.  अर्धा कप घट्ट दही घ्या आणि त्यात २ चमचे मध  चांगले मिसळा आणि आपला चेहरा आणि मानेवर हा मास्क लावा.  20 मिनिटांनी कोरडे होऊ द्या आणि धुवा.

 

दही आणि स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये असलेले सॅलिसिलिक अॅसिड आणि दह्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मांसह तुम्हाला त्वरित चमकदार त्वचा देईल.  2-3 ताज्या स्ट्रॉबेरी एक कप दह्यामध्ये मिसळा.  ब्रशच्या सहाय्याने चेहरा आणि मानेवर लावा. कोरडे होऊ द्या आणि थंड पाण्याने धुवा.

 

दही आणि बेसन

दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत.  त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स  स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे.  अर्धा कप दूध आणि दह्यामध्ये 2 चमचे बेसन मिसळा. त्यात थोडं बेसनही घालू शकता. ते चांगलं मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर हलक्या हातांनी  घासून घ्या.

 

हळद आणि दही

हळदीच्या अँटीबॅक्टेरीयल गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहिती आहे.  दही तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवतेच शिवाय अतिरिक्त तेलसुद्धा काढून टाकेल. अर्धा कप लो फॅट दह्यात १ चमचा हळद मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा.  20-25 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ धुवा.

 

(वरील दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही खातजमा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)