नसांमध्ये चिटकून राहिलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल घरीच करा कंट्रोल, 6 पदार्थांनी सहज बाहेर फेकेल

How to Reduce Cholesterol Fast : मधुमेह आणि रक्तदाबाप्रमाणेच कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एकदा कोलेस्ट्रॉलची गोळी घेतली तर ती कायमच घ्यावी लागते. अशावेळी घरगुती पदार्थांनीच कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्या फोडून टाका. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 6, 2024, 06:30 PM IST
नसांमध्ये चिटकून राहिलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल घरीच करा कंट्रोल, 6 पदार्थांनी सहज बाहेर फेकेल title=

कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी घरगुती उपाय देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ठराविक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी तुमची चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार कारणीभूत असल्याचं अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी आहारातील काही पदार्थांचा अति वापर घातक ठरतो. तसेच कमी करण्यासाठी देखील आहारच महत्त्वाचा ठरतो. 

कडधान्ये

कडधान्यामध्ये भरपूर पोषकतत्त्व असतात. बीन्समध्ये विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असते. तसेच कडधान्य पचायला जास्त वेळ लागतो. अनेकदा कडधान्य खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची समस्या जाणवते. अशावेळी आहारामध्ये कडधान्यांचा समावेश करा. 

अळशी 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अळशीचा वापर करावा.  हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी अळशीचा काठा देखील घेऊ शकता. तसेच अळशी पचायला सोपी असती. तुमच्या सॅलडसाठी एक चमचे ग्राउंड फ्लेक्ससीड वापरा.

तृणधान्ये 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी संपूर्ण धान्य म्हणजे तृणधान्यांचा वापर आहारात करावा.  कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आहारात यांचा समावेश करा. दररोज 30 ग्रॅम संपूर्ण धान्य सेवन केल्याने एकूण सीरम कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल दोन्हीची पातळी कमी होण्यास मदत होते.

सुकामेवा

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य बरे होते, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे . दररोज भिजवून किंवा सुक्या स्वरुपात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. सुकामेव्यात अतिरिक्त पोषक घटक असतात जे हृदयरोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. वरील पदार्थांचा समावेश आहारात न चुकता केल्यास घाणेरडा कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

तेलाचा वापर टाळा

तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जेवणात जास्त तेलाचा वापर करू नका. तुम्ही तुमच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, मासे यांचा समावेश असलेला कमी चरबीयुक्त आणि उच्च प्रथिनयुक्त आहार घ्यावा.

लिंबू

त्याच वेळी, उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी, आपण अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी म्हणजेच लिंबू सेवन केले पाहिजे. त्यात विरघळणारे फायबर असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. आम्ही तुम्हाला सांगतो की आंबट फळे रक्तवाहिन्या स्वच्छ करण्याचे काम करतात आणि त्यातील एन्झाइम्स चयापचय मजबूत करतात.

अंबाडी 

उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अंबाडीच्या बियांचेही सेवन केले जाऊ शकते. वजन कमी करण्यासोबतच हृदय निरोगी ठेवते. त्याची पावडर गरम पाण्यासोबत घेता येते. सकाळी ते पिणे खूप प्रभावी ठरू शकते.

मेथी

या यादीत मेथीचे दाणेही येतात. उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याची क्षमता देखील यामध्ये आहे. याचे औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहावरही खूप फायदेशीर आहेत.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)