उभं राहून पाणी पिता मग 'या' 7 गोष्टी जरूर वाचा

अनेकदा आपण आई किंवा आजीकडून ओरडा खाल्या असतील आणि त्याचं कारण एकच ते म्हणजे 'पाणी उभं राहून पिऊ नका'.... पाणी उभं राहून प्यावं की बसून प्यावं याबाबत अद्याप लोकांमध्ये संभ्रम आहे. नेमकं आरोग्यासाठी चांगल काय हा मुद्दा महत्वाचा आहे. उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी कायम धोकादायक असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण 12 ते 15 तास घराबाहेर असतो. अशावेळी पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते.आणि ती शरीरासाठी घातक असते. 

Dakshata Thasale Updated: Mar 22, 2018, 12:57 PM IST
उभं राहून पाणी पिता मग 'या' 7 गोष्टी जरूर वाचा title=

अनेकदा आपण आई किंवा आजीकडून ओरडा खाल्या असतील आणि त्याचं कारण एकच ते म्हणजे 'पाणी उभं राहून पिऊ नका'.... पाणी उभं राहून प्यावं की बसून प्यावं याबाबत अद्याप लोकांमध्ये संभ्रम आहे. नेमकं आरोग्यासाठी चांगल काय हा मुद्दा महत्वाचा आहे. उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी कायम धोकादायक असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण 12 ते 15 तास घराबाहेर असतो. अशावेळी पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते.आणि ती शरीरासाठी घातक असते. 

उभं राहून पाणी प्यायलावर शरिरावर होतो असा परिणाम 

1) सांधेदुखी

उभ्याने आणि घाईघाईने पाणी प्यायल्यामुळे सर्वात जास्त परिणाम हा सांध्यावर होत असते. यामुळे आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते आणि मग हा सांधेदुखीचा त्रास आयुष्यभराचा सोबती होतो. त्यामुळे बसून पाणी पिणं आवश्यक आहे. 

2) पचनाचे विकार

उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

3) तहान भागत नाही

उभं राहून पाणी प्यायल्यावर तहान कधीच भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते. आणि पाण्याचा चांगला आस्वाद घेता येतो. 

4) पचनाला कठीण

उभं राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

5) किडनीचे आजार

उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते. अनेकदा किडनीचा त्रास झाल्यास डॉक्टर सर्वात प्रथम बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. 

6) शरीरातील आम्ल पदार्थांचे प्रमाण कमी होत नाही

आयुर्वेदामध्ये नमूद केल्याप्रमाणे पाणी उभ्याने आणि घाईघाईमध्ये पिऊ नये. पाणी शांतपणे बसून प्यावे. असे केल्यास शरीरामधील आम्लाच्या (अॅसिडच्या) प्रमाणात समतोल राखला जातो. उभ्याने पाणी प्यायल्यास शरीरातील इतर द्रव्यांबरोबर ते मिसळत नाही. या उलट बसून पाणी प्यायल्यास ते योग्य प्रमाणत शरीरातील आम्ल पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांचे शरीरातील समतोल राखण्यास मदत करते.

7) जळजळीचा त्रास

उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.