'या' पद्धतीने डोक्याला तेल लावल्यास लवकर टक्कल पडेल, ऑयलिंगची योग्य पद्धत

How To Apply Hair Oil : अनेकदा केसांना तेल कसे लावावे हा प्रश्न पडतो? हेअर ऑयलिंग केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने करणे तुम्हाला टक्कले करु शकते.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 31, 2024, 06:12 PM IST
'या' पद्धतीने डोक्याला तेल लावल्यास लवकर टक्कल पडेल, ऑयलिंगची योग्य पद्धत title=

केसांची मजबूती आणि दाट केसांसाठी नियमित केसांना तेल लावणे खूप फायदेशीर ठरू शकते. पण काही वेळा केसांना चुकीच्या पद्धतीने तेल लावल्याने केस गळतात. अशा परिस्थितीत केसांना योग्य प्रकारे तेल लावणे खूप महत्त्वाचे ठरते. तज्ञांच्या मते, जर तुम्हाला तुमच्या केसांच्या योग्य वाढीसाठी आठड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावा. केसांना तेल कसे लावू नये आणि योग्य पद्धत कोणती आहे?

असे मसाज टाळा 
बरेच लोक केसांना तेल लावताना ते जोरात घासतात आणि मसाज करतात. अशा प्रकारे मसाज केल्याने केस तुटतात. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना तेल लावा तेव्हा जास्त वेगाने घासण्याचा प्रयत्न करू नका.

रात्रभर तेल लावून 
केसांमध्ये तेल सोडू नका.. अनेक लोकांमध्ये एक गैरसमज आहे की, रात्रभर केसांना तेल लावल्याने केसांना खोल पोषण मिळते. पण हे तुमच्या केसांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे रात्रभर केसांना तेल कधीही लावू नका.

(हे पण वाचा - Health Benefits of Blue Cheese : हाडांना लोखंडासारखा टणक करेल ब्लू चीज, खाण्याचे जबरदस्त फायदे)

तेल लावल्यानंतर कोम करावे का 
तेल लावल्यानंतर केसांना फणी फिरवल्यास जास्त केस गळू शकतात. तेल लावल्यानंतर, तुम्हाला काही काळ टाळूला विश्रांती द्यावी लागेल. जर तुम्ही टाळूला खूप वेगाने घासण्यास सुरुवात केली तर केस तुटण्याची शक्यता असते.

हेअर ऑयलिंग केल्यावर केस बांधू नये 
तेल लावल्यानंतर केसांमधून फणी फिरवल्यास जास्त केस गळू शकतात. तसेच घट्ट केस बांधल्यासही केस तुटू शकतात.

(हे पण वाचा - Bad Cholesterol ला मुळापासून दूर करण्यासाठी सकाळीच प्या 'हा' चहा, रात्रीपर्यंत दिसेल फरक) 

असे कराल ऑयलिंग 
केसांना तेल लावण्यासाठी तेल नेहमी कोमट वापरा. यानंतर, कोरड्या केसांना तेल लावा आणि सुमारे 1 ते 2 तासांनी केस चांगले धुवा. या काळात केसांना जास्त घासणे किंवा कंगवा करू नका हे लक्षात ठेवा. तेल लावल्यानंतर केसांना कॅप लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)