5 Best Pulses for Strong Heart: वेळी-अवेळी खाणे, फास्ट फुडचे अतिप्रमाणात सेवन यामुळं अनेक आजार जडण्याची शक्यता असते. पौष्टिक अन्नाची शरीराची कमतरता भासल्यास त्याचे परिणामही लगेच दिसायला लागतात. अनहेल्दी जेवण किंवा पदार्थ खाल्ल्याने तुमचे हृद्य कमजोर व्हायला सुरुवात होते. अशावेळी थोडेसे चालले तरीही दम लागतो. अशावेळी तुमचे हृदय नाजूक झाले आहे हा संकेत मिळतो. हृदयरोगाचे आजार टाळण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याची गरज आहे. ब्रिटिश हेल्थ फाउंडेशनच्या मते आहारात विविध डाळींचा समावेश करावा. डाळींमध्ये पुरेसे प्रोटीन उपलब्ध असते. यात फायबर आणि लो फॅटदेखील असते. यामुळंच हृदय मजबूत ठेवण्यासाठी डाळी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मसूर डाळः डाळी या एकप्रकारे बियाच असतात. त्यामुळं बियांमध्ये असलेले सर्व आवश्यक गोष्टी डाळींमध्ये उपलब्ध असतात. डाळींमध्ये मसूराची डाळ सर्वात पौष्टिक आणि शक्तीवर्धक असते. मसूराच्या डाळीत पोषक तत्वांचा खजिना असते. मसूर डाळीत अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. मसूरीच्या डाळीत कॅल्शियम आणि डायट्री फायबरची पुरेशी मात्रा असते. त्यामुळ मसुराची डाळ हार्ट अॅटोक आणि स्ट्रोकचा धोका कमी करते.
तुर डाळः तुरीच्या डाळीत पुरेसे अॅमिनो अॅसिड आढळते. अॅमिनो अॅसिडमध्ये प्रोटीन आढळले जाते. शरीराला रोज अॅमिनो अॅसिडची गरज भासते. खासकरुन हृदयाला. तुरीच्या डाळीतील घटक हृदयाचे मसल्स मजबूत करतात.
उडदाची डाळः उडदाची डाळ खूपच पौष्टिक मानली जाते. खूप जण उडदाच्या डाळीचे वरण मोठ्या आवडीने खातात. या डाळीत सॉल्यूबल डायट्री फायबर असते जे हृदयासाठी चांगलं मानले जाते. उडदाच्या डाळीचे सेवन केल्यामुळं चेहऱ्यावर ग्लो येतो आणि रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते.
बदामः बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे. बदामात अनसॅचुरेटेड फॅट असते ज्यामुळं गुड कोलेस्ट्रॉल वाढते. त्याचबरोबर यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि प्लांट स्टोरोल्सदेखील असते. जे हृदयासाठी फायदेशीर असते.
हिरव्या पालेभाज्याः हिरव्या पालेभाज्या जर तुम्ही दररोज सेवन करत असाल तर तुम्हाला हृदयरोगासारखे आजार कधीच होणार नाहीत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक व्हिटॅमिन्ससह अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळं गुड कॉलेस्ट्रॉल वाढते आणि आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)