मुंबई : अनेकांना वजन घटवणं हे अतिशय आव्हानात्मक काम वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर काही गोष्टींबाबत पथ्यपाणी सांभाळल्यास तुम्ही अगदी आरामात वजन घटवू शकता. सकाळच्या वेळेस ताज्या आणि कोवळ्या सुर्यकिरणांनी आपल्याला उर्जा मिळते. दिवसाची ही नवी सुरूवात आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
रोज सकाळी बेडमधून उठताना कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या. प्रामुख्याने सकाळी 6-10 या वेळेतील सूर्यकिरणं शरीराला अतिशय फायदेशीर आहेत. यामुळे दिवसाची फ्रेश सुरूवात होते. शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा करण्यासोबतच बॉडी मास इंडेक्स नियमित ठेवण्यास मदत होते.
कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते. व्यायामामुळे मूड सुधारण्यास मदत होते.
अनेकजण उपासमार करून वजन घटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र वजन घटवण्यासाठी नाश्ता वेळेत करणं आणि नियमित करणं फायदेशीर आहे. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. मूड उत्तम राहतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. सकाळी अंड, केलं, अॅव्हॅकॅडो खाल्ल्याने शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. सकाळी नाश्ता न करण्याचे धोकादायक परिणाम
सकाळी उठताच थोडं फार स्ट्रेचिंग करणंही आरोग्याला फायदेशीर आहे. सकाळी स्ट्रेचिंग केल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते.