''झिम्मा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी पब्लिसिटी स्टंट, सोनाली, सिद्धार्थचं सोशल मीडियावर 'ट्वीव ट्वीव'

मराठी सिनेस्टार कालपासून ट्विटर, इंन्स्टाग्रामवर  पिकनिकला जायचं आहे असं ट्विट करत होते. या ट्विटनंतर सगळीकडे एकचं चर्चा होती

Updated: Mar 5, 2021, 01:35 PM IST
''झिम्मा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी पब्लिसिटी स्टंट, सोनाली, सिद्धार्थचं सोशल मीडियावर 'ट्वीव ट्वीव' title=

मुंबई  : मराठी सिनेस्टार कालपासून ट्विटर, इंन्स्टाग्रामवर  पिकनिकला जायचं आहे असं ट्विट करत होते. या ट्विटनंतर सगळीकडे एकचं चर्चा होती हे नक्की आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, मृणाल गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर अशी बडी स्टारकास्ट आहे. या कलाकारांनी चक्क ट्विटरवर लिहिलं आहे, फिरायला जायचंय, पाणीपुरी खायला जायचंय, असा बराचं प्लान केला आहे. .ही ट्विट पाहुन नेटकरी देखील भारावून गेले. परंतु कालपासून रंगलेली चर्चा आता अखेर संपली आहे. हा पब्लिसीटी स्टंट असल्याचं समोर आलंय.

अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या बहुप्रतिक्षित 'झिम्मा' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 23 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनंतरचा हा पहिला मोठा सिनेमा बॉक्सऑफिसवर येण्यासाठी सज्ज झालाय. 

या सिनेमात सोनाली कुलकर्णी, मृणाल गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या पोस्टरमध्ये नंदिनी, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, आणि क्षिती जोग हे वर्तुळाकारात जमीनीवर झोपलेले दिसतायेत.

या सिनेमातील सगळ्या कलाकारांनी झिम्मा या सिनेमाचं पोस्टर शेअर करत, 'म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो, आता या नव्या वर्षात, नवे आपण, खेळूया. 'झिम्मा' २३ एप्रिल पासून', असं एक भन्नाट कॅप्शन देखील दिलयं

याआधी हेमंत ढोमच्या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलंय तसंच संदेश देखील दिले आहेत. बडी स्टारकास्ट असलेला झिम्मा हा सिनेमातून काय पहायला मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागलय. हेमंत ढोमेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ,विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या सिनेमाची निर्मीती केली आहे. या सिनेमाच्या पोस्टरवरुन हा सिनेमा कौटुंबिक मनोरंजन करणारा असेलं असल्याचं समजतयं. हा सिनेमा २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांना या सिनेमासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे