झीनत अमान यांनी दिवंगत फिरोज खान यांच्यावर गंभीर आरोप करताच; मुलगा फरदीन म्हणाला, 'आंटी...'

Zeenat Aman - Fardeen khan : झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फिरोज खान यांच्यावर केले  गंभीर आरोप, तर फरदीन खाननं दिली अशी प्रतिक्रिया...

दिक्षा पाटील | Updated: Jan 6, 2024, 04:45 PM IST
झीनत अमान यांनी दिवंगत फिरोज खान यांच्यावर गंभीर आरोप करताच; मुलगा फरदीन म्हणाला, 'आंटी...' title=
(Photo Credit : Social Media)

Zeenat Aman - Fardeen khan : बॉलिवूड अभिनेता झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील त्यांच्या प्रोफाईलमुळे चर्चेत असतात. झीनत अमान सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमुळे चांगल्याच चर्चेत असतात. झीनत अमान यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता फिरोज खान यांच्यासोबत काम करण्यावर वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे ‘कुर्बानी’ च्या सेटवर उशिरा आल्यानं फिरोज यांनी त्यांचे पैसे कापले होते. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी आणि फिरोज यांच्यात काही ठीक नव्हतं, त्यानंतर त्यांनी खूप सुनावलं होतं. त्यावर आता फिरोज खान यांचा मुलगा आणि अभिनेता फरदीन खाननं प्रतिक्रिया दिली आहे. 

‘कुर्बानी’ हा चित्रपट 1980 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन फिरोज यांनीच केले होते. फरदीननं झीनत अमान यांची पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत फरदीन म्हणाला की 'झीनत अमान काकू, जर ही सांत्वन असेल तर कुटुंबाला देखील त्यांनी सोडलं नाही. आम्हाला आजही 25 टक्के 'स्टॅंडर्ड फॅमिली डिस्काउंट' मिळाला आहे. त्यानं हे देखील सांगितलं की जर आता दिवंगत दिग्दर्शक आता असते तर त्यांच्या पोस्टवर हसले होते. खान साहेब आज असते तर त्यांना तुमची पोस्ट प्रचंड आवडली असती. ते जोरात हसले असते.' 

zeenat aman made serious allegations on firoz khan his son and actor fardeen replys

हेही वाचा : 'मी शेवटपर्यंत त्यांना भेटू शकलो नाही'; दिवंगत अभिनेत्याच्या समाधीजवळ सूर्या ढसाढसा रडला

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय म्हणाल्या होत्या झीनत अमान? 

झीनत अमान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फिरोज खान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत झीनत अमान म्हणाल्या, 'फिरोज खान आणि माझी सुरुवात चांगली झाली नव्हती. ही 70 च्या दशकातील गोष्ट आहे, जेव्हा फिरोज खान हे यशाच्या शिखरावर होते. त्यांनी मला त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी बोलावलं, पण मी ऑफर नाकारली. रागाच्या भरात फिरोज यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचे बोलणे ऐकून मी रिसीव्हर कानापासून दूर ठेवला. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांनी मला पुन्हा फोन केला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की मुख्य भूमिका आहे. त्यामुळे नकार देऊ नकोस. अशा प्रकारे मी कुर्बानी चित्रपटाचा भाग झाले.'