'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मालिकेने जिंकल प्रेक्षकांचं मन 

Updated: Jan 4, 2022, 11:13 AM IST
'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप  title=

मुंबई : झी मराठीवर कायमच नवे नवे प्रयोग केले जातात. मालिकांच्या रुपात मांडले जाणारे हे सगळे प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीला पडतात. पण मालिका जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेते. अशीच एक 'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 

'झी मराठी' सध्या वेगवेगळ्या मालिका चर्चेत आहे. यातील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच मन जिंकत आहे. श्रीमंत आणि गरिबीची उत्तम सांगड घालत ही मालिका गुंफली गेली आहे. 

स्वीटू आणि ओमची लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडत आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोघं आपल्या संसाराला सुरूवात करतात. पण या संसारात विघ्न येतं मालविकाचं. 

मालविका या दोघांचा संसार उद्धवस्त करायला निघाली आहे. याकरता ती वेगवेगळी कारण शोधत आहे. मालविकाला या सगळ्यात तिचे वडिल म्हणजे मिस्टर खानविलकर देखील साथ देतात. 

पण या सगळ्या परिस्थितीवर मात करत ओम आणि स्वीटू आपलं प्रेम जपतात. संसार सुखाचा करतात. पण मालिकेत अखेरीस काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पण ही मालिका कधी प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तुर्तास तुम्ही या मालिकेचा आनंद घेऊ शकता. 

सर्वांनाच माहिती आहे स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर आणि शाल्वची ऑफस्क्रिन केमिस्ट्री फार भन्नाट आहे. दोघेही प्रचंड फूडी असून सेटवर देखील ते सतत खादाडी करत असतात. शाल्व इटालियन पिझ्झा बनवतोय म्हटल्यावर अन्वितामधील खवय्या एकमद जागा झालाय. दोघांमधील केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसून आली.

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेविषयी बोलायचे झाले तर मालिका सध्या एका नव्या वळणार आहे. स्वीटू आणि ओम यांचे लग्न झाले असून मालविका त्यांच्या संसारात लुडबूड करताना दिसतेय. त्यामुळे स्वाटू आणि ओम यांच्या पुढचा संसार सुरळीत होईल का अशी चिंता सर्वच व्यक्त करत आहेत.