Ghoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहितीये का?

Yuvraj Singh Helped Saiyami Kher: सैयामी खेरने जेव्हा घूमर सिनेमाची स्क्रिप्टवर वाचली, तेव्हा तिला तिच्या व्यक्तिरेखेची खोली लगेच जाणवली. अभियन करणं किती कठीण जाणार आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. 

Updated: Aug 19, 2023, 06:19 PM IST
Ghoomer : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह आणि 'घूमर' सिनेमाचं कनेक्शन माहितीये का? title=
Yuvraj Singh, Ghoomer

Yuvraj Singh Connection with Ghoomer Movie: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा घूमर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. एका हातानं बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची कथा दाखवणारा हा सिनेमा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तर सैयामी खेर हिच्या अभिनयाचं देखील कौतुक होताना दिसत आहे. अशातच आता सिनेमावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहे. वीरेंद्र सेहवागपासून ते सौरव गांगुलीने देखील सिनेमाचं कौतुक केलंय. मात्र, घूमर सिनेमा आणि सिक्सर किंग आणि वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंह (Yuvraj Singh) यांचं कनेक्शन माहितीये का?

सैयामी खेरने जेव्हा घूमर सिनेमाची स्क्रिप्टवर वाचली, तेव्हा तिला तिच्या व्यक्तिरेखेची खोली लगेच जाणवली. अभियन करणं किती कठीण जाणार आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. एक हात गमावल्यानंतर अपेक्षा झुगारून पुन्हा खेळ स्वीकारण्याचे धैर्य मिळवणं सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे तिला मानसिक परिणामांना देखील सामोरं जावं लागणार होतं. त्यावेळी तिने आवश्यक असलेल्या मानसिक लवचिकतेवर खोलवर विचार केला आणि युवराज सिंहची भेट घेण्याचं ठरवलं. 

युवराज सिंगने आपल्या ऑलराऊंडर कामगिरीच्या जोरावर 2011 चा वर्ल्ड कप जिंकवला होता. कॅन्सर असल्याचं माहित असताना देखील युवराज प्रत्येक सामना खेळला. तो मैदानात लढला आणि जिंकला सुद्धा... मात्र, युवराज सिंगच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं होतं. त्याच्या मेडियास्टिनल सेमिनोमा, फुफ्फुसांमध्ये वसलेला एक ट्यूमर असल्याचे निदान झाल्याने, त्याला मैदानाबाहेर लढाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्याने 2012 मध्ये उपचार घेतल्यानंतर पुढील 2 वर्षात पुन्हा कमबॅक केलं अन् करियरमधील सर्वोच्च धावसंख्या उभी करून दाखवली. युवराजची कहाणी सर्वांसाठी नक्कीच प्रेरणदायी आहे. सैयामीने तिच्या पात्राची मानसिकता समजून घेण्याच्या उद्देशाने युवराज सिंगशी सखोल संवाद साधला. युवीने देखील कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात त्याने अनुभवलेल्या भावना, भीती आणि आशा तिच्यासोबत शेअर केल्या. त्यावेळी युवराजने क्रिकेटच्या मैदानात परतण्याच्या त्याच्या इच्छेचे किस्से देखील सांगितले.

आणखी वाचा - 'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video

घूमर सिनेमा माझ्यासाठी विजयाचे सार प्रतीक आहे. आणि युवराजपेक्षा विजयाची चर्चा कोण करू शकेल का? असं म्हणत सैयामीने युवराजचं कौतुक केलं होतं. माझ्यासाठी घूमर हा केवळ एक चित्रपट नाही. हे अदम्य मानवी आत्म्याचा पुरावा आहे, असं ती म्हणते. घूमरच्या स्क्रीनिंगवेळी युवराज सिंहने देखील हजेरी लावली होती. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.