युट्यूबर एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांची अ‍ॅक्शन

Elvish Yadav Arrested : युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी केली अटक 

दिक्षा पाटील | Updated: Mar 17, 2024, 04:01 PM IST
युट्यूबर एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांची अ‍ॅक्शन title=
(Photo Credit : Social Media)

Elvish Yadav Arrested : यूट्यूब सेंसेशन एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' विनर ठरलेल्या एल्विश यादव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सगळ्यांचं लक्ष वेधतो. आता एल्विशला पोलिसांनी अटक केली आहे. खरंतर, नोएडामध्ये झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये स्नेक बाइट प्रोव्हाईड करण्याच्या प्रकरणता एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे. काही वेळातच त्याची कोर्टात हजेरी लावण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी सेक्टर 39 मध्ये नोएडा पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. आज एल्विशला याच प्रकरणात चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. नोएडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एल्विश यादववर आरोप करण्यात आले की पार्टी आणि क्लब्समध्ये सापाचे बाईट म्हणजेच स्नेक बाइट पुरवायचा. दरम्यान, आपल्या देशात असं काही करणं म्हणजे एक गुन्हा आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याच प्रकरणात एकदा चौकशी केली होती. मात्र, त्यानं दिलेल्या उत्तरानं पोलिस संतुष्ट नाही आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर, या प्रकरणा दरम्यान, 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांना छापा टाकल्यानंतर तिथे 20 मिलीमीटर स्नेक वेनम आणि 9 विषारी साप मिळाले. त्यात 5 कोब्रा, एक अजगर, दोन मांडूळ, आणि रॅट स्नेक देखील होते. आरोपिंनी चौकशीत सांगितलं की एल्विश यादवच्या पार्टीत साप आणि विषचा पुरवठा करायचे. त्यानंतर सेक्टर-49 कोतवाली पोलिसांनी एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर त्यानं यावर सुरुवातीला स्पष्टीकरण दिलं होतं की त्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे. 

हेही वाचा : मुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट

सुरुवातीला एल्विश यादवर संकटांचा मोठा डोंगर आला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सगळ्यात आधी रेव्ह पार्टीत वापरण्यात येणारं सापाचं विष आणि त्यासोबत साप. त्यानंतर गुरुग्राममध्ये असलेल्या एका युट्यूबरला मारहाण करण्याचा आरोप. त्यानंतर एल्विशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो पीएफएच्या कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहे. या प्रकरणात पीएफए कार्यकर्त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली होती. तर एल्विश विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.