अरमान मलिकने शेअर केलं बेडरुम सीक्रेट, म्हणतो 'दोघींपैकी पहिली पत्नी जास्त...'

Youtuber Armaan Malik Likes To Share Bed With First Wife Payal Malik : युट्यूबर अरमान मलिकनं बिग बॉस ओटीटीच्या स्टेजवर सांगितलं बेडरूम सिक्रेट

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2024, 11:59 AM IST
अरमान मलिकने शेअर केलं बेडरुम सीक्रेट, म्हणतो 'दोघींपैकी पहिली पत्नी जास्त...' title=
(Photo Credit : Social Media)

Youtuber Armaan Malik Likes To Share Bed With First Wife Payal Malik : यूट्युबर अरमान मलिक हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचं नेहमीच चर्चेत असण्याचं कारण त्याच्या दोन पत्नी आहेत. तो पायल मलिक आणि क्रितीता मलिक या दोघींसोबत 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसणार आहे. त्याच्या दोन्ही पत्नी या एकमेकांसारख्याच थोड्याफार दिसतात. प्रेक्षकांना हे फार विचित्र वाटतं. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये अरमान मलिक त्याच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितलं आणि एक मजेशीर खेळ देखील खेळला.

या शोचे सुत्रसंचालक अनिल कपूर हे अरमान मलिकाला मजेशीर खेळ खेळण्यास सांगतात आणि त्यावेळी त्याला एक सिच्युएशन दिली. अरमानला त्याच्या पत्नींपैकी एकीला किस करायला सांगितलं जिच्यासोबत तो फिट बसतो. जेव्हा अरमानला फक्त एकाच पत्नीसोबत सेक्स करण्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यानं पहिली पत्नी पायल मलिकची निवड केली. त्यानंतर त्याला विचारण्यात आलं की त्याला कोणी शो जिंकायला हवा असं वाटतं तर त्यावर उत्तर देत तो क्रितीकाला किस करतो आणि म्हणाला की ती भावूक होते. पुढे त्याला रोमॅन्टिक पार्टनरविषयी विचारण्यात आलं तेव्हा अरमाननं पायलला किस केलं आणि सांगितलं की ती क्रितीकापेक्षा जास्त रोमॅन्टिक आहे. 

अरमान मलिकनं त्याच्या दोन्ही पत्नींसोबत त्याच्या लव्ह स्टोरी शेअर केली आणि सांगितलं की त्यांनी 6 दिवसाच्या आत पायलवर प्रेम झालं आणि सातव्या दिवशी दोघांनी लग्न केलं. अरमान मलिकशी लग्न करण्यासाठी पायल तिच्या घरातून पळाली होती. 

हेही वाचा : 'माझं काम चोरलं...', 'कल्कि 2898 एडी' चा ट्रेलर प्रदर्शित होताच निर्मात्यांवर आणखी एका हॉलिवूड कलाकाराचे आरोप

'बिग बॉस ओटीटी 3' च्या स्टेजवर अरमान त्याच्या दुसऱ्या पत्नीविषयी म्हणजेच क्रितिकाविषयी बोलताना म्हणाला, कृतिका पायलची मैत्रिण होती आणि त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्यांच्या घरी आली होती. तिचा बाहेर जाण्याचा प्लॅन होता, पण तो कॅन्सल झाला. त्यामुळे ती त्यांच्याच घरी थांबली. त्याच दरम्यान, अरमान मलिकला क्रितिकाशी प्रेम झालं आणि 6 दिवसाच्या आत त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर अरमाननं पायलला त्यांच्या लग्नाचा फोटो पाठवला. ती सुरुवातीला या लग्नाला स्वीकार करत नव्हती, मात्र नंतर तिनं या लग्नाला स्वीकारले.