#MeToo 'लवकरच अमिताभ बच्चन यांचा खरा चेहरा जगासमोर'

तिची .ही भूमिका सर्वनांच धक्का देऊन गेली आहे

Updated: Oct 13, 2018, 02:18 PM IST
#MeToo 'लवकरच अमिताभ बच्चन यांचा खरा चेहरा जगासमोर' title=

मुंबई: #MeToo चळवळीअंतर्गत बऱ्याच अभिनेत्रींनी कलाविश्वात त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाविषयी, लैंगिक शोषणाविषयी वक्तव्य केलं आहे. मुख्य म्हणजे नाना पाटेकर यांच्या नावापासून हे आरोपांचं सत्र सुरु झालं असून, आता ते थेट बी टाऊनमधील काही प्रसिद्ध चेहऱ्यांपर्यंत पोहोचलं आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या नावाच्या चर्चांनाही आता उधाण येऊ लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या चळवळीविषयी आपली प्रतिक्रिया दिली होती. 

#MeToo विषयी वक्तव्य करत बिग बी म्हणाले होते, 'कोणत्याही महिलेने अशा प्रकारचं गैरवर्तन  सहन करु नये. अशा घटनांविषयी लगेचच इतरांसमोर वाच्यता करणंही गरजेचं आहे. ज्यानंतर आरोपींविरोधात कारवाई होणंही महत्त्वाचं आहे.'

बिग बींच्या या वक्तव्याविषयीचं एक ट्विट सोशल मीडियावर करण्यात आलं, ज्यानंतर सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी हिने त्याला उत्तर देत एक असं ट्विट केलं, जे पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

बिग बींच्या त्या वक्तव्याला खोटं ठरवत सपनाने लिहिलं, 'हे किती खोटं बोलत आहेत. सर, तुमचा पिंक हा चित्रपट प्रदर्शित होऊन गेलाही (त्याचा प्रेक्षकांना विसर पडला). त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जी तुमची प्रतिमा आहे, तीसुद्धा काही दिवसांनी मलिन होईल. सत्य अवघ्या काही दिवसांनी सर्वांसमोर येईलच. आता तर तुम्ही फक्त नखं नाही तर हातही कुरतडत असाल. कारण नखंही तुम्हाला कमी पडतील.'

सपनाने केलेलं हे ट्विट पाहता एकाएकी तिची .ही भूमिका सर्वनांच धक्का देऊन गेली आहे. मुळात तिने ट्विट करत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटचाही यात उल्लेख केला आहे. 

बच्चन यांनी मात्र तिच्या या ट्विटला अद्यापही काहीच उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आता ते याविषयी आपली भूमिका मांडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.