Asha Parekh on Marriage Rumors with Shammi Kapoor: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिलंत. आपल्या दमदार अभिनयाने 60 ते 70 च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्यांचा उल्लेख होतो. त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. राजेश खन्ना, मनोज कुमार , सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केली. आशा पारेख यांनी शम्मी कपूरबरोबर त्यांचा पहिला चित्रपट केला होता. त्यांना शम्मीजींबरोबर काम करताना कंफर्टेबल वाटायचं असं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
एक काळ असा होता जेव्हा आशा पारेख यांचं वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा झाल्यात. ज्यामध्ये शम्मी कपूरसोबतचे त्यांचे अफेअर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतचे ताणवाबद्दल अफवा पसरल्या होत्या. या सर्वांबद्दल आशा पारेख यांनी कधीही लक्ष दिलं नव्हतं. पण अरबाज खानच्या शो 'द इनव्हिन्सिबल्स' या शोमध्ये आशा पारेख यांनी शम्मी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हाबद्दलच्या अफवेबद्दल मौन सोडलंय.
अरबाज खानच्या द इन्व्हिन्सिबल्स सीरिजच्या सीझन 2 चा पहिला टीझर प्रदर्शत झाला आहे. जिथे आशा पारेख पाहुण्या म्हणून आल्या आहेत. अरबाजच्या शोमध्ये शम्मी कपूरसोबतच्या लग्नाच्या अफवांवर आशा पारेख यांना विचारलं. त्यावेळी त्या अगदी गंमतीत म्हणाल्यात की, 'होय, आम्ही लग्न केले होते.'
या शोमध्ये आशा पारेख यांनी जेव्हा गुरु दत्तने तिच्या आईला सांगितलं होतं की, ती हिरोईन बनू शकतं, या आठवणीला उजाळाला दिला. एवढंच नाही तर अरबाज खानच्या शोच्या टीझरमध्ये आशा पारेख यांनी शत्रुघ्न सिन्हांसोबतच्या नात्यातील मतभेदांबद्दल भाष्य केलंय.
आशा यावर म्हणाल्यात की, 'हे तर असं होतं की मी मला वाटेल तसं वागू शकत होते. पण, त्यानंतर त्यांनी माध्यमांमध्ये अशी वक्तव्य केली, जी खरंतर माझ्यासाठी नव्हे, तर त्यांच्यासाठी अपमानास्पद होती...'
आशा पारेख यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर कटी पतंग, तीसरी मंझिल, मेरा गाव मेरा देश, आवो मिलो सजना, कारवां, दिल देके देखो, लव्ह इन टोकियो, मेरे सामान यांसारख्या अनेक चित्रपटांचा आजही प्रेक्षकांना बघायला आवडतात. 1981 पर्यंत येता येता आशा पारेख यांनी आपलं काम कमी केलं अन् काही काळानंतर त्या रुपेरी पडद्यापासून दूर झाल्यात. मात्र आता अभिनेत्रीने टेलिव्हिजनकडे वळल्या असून अनेक गुजराती शोचे दिग्दर्शन आणि निर्मिती त्या करतात.