'पिवळ्या साडीतल्या महिले'ची 'ही' इच्छा

पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या रीना द्विवेदी त्यांच्या निवडणूक ड्यूटीनंतर चांगल्याच प्रकाश झोतात आल्या आहेत.

Updated: May 16, 2019, 09:44 PM IST
'पिवळ्या साडीतल्या महिले'ची 'ही' इच्छा title=

मुंबई : देशात लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात दाखल झालीय. नेत्यांच्या घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप यांच्या चर्चां दरम्यान दोन निवडणूक महिला अधिकाऱ्यांचीही जोरदार चर्चा झालीय. पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या रीना द्विवेदी त्यांच्या निवडणूक ड्यूटीनंतर चांगल्याच प्रकाश झोतात आल्या आहेत.
  
सार्वजनीक बांधकाम खात्यात कार्यरत असलेल्या रीना द्विवेदी यांनी 'बिग बॉस'च्या पुढील भगात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की 'माझं संपूर्ण कुटुंब माझ्या पाठी कायम खंबीर पणे उभं राहिलं आहे, मला मिळतं असलेल्या प्रसिद्धीमुळे ते खूपच खूश आहेत. जर टीव्ही क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर 'बिग बॉस'मध्ये काम करायला आवडेल.'

एका स्थानिक वृत्तपत्राने या महिलेचा फोटो प्रकाशित केला होता. ज्यात ही महिला ईव्हीएम घेऊन जाताना दिसली होती. या महिलेला लखनऊच्या शहरातील नगराम भागातील १७३ नंबरच्या मतदान केंद्रावर निवडणूक ड्यूटी लावण्यात आली होती.