स्मृती इराणी जिंकणार - एकता कपूर

एकेकाळी छोटा पडदा एकत्र गाजवलेल्या स्मृती इराणीना त्यांच्या मैत्रिणीने प्रोत्साहन दिले आहे. 

Updated: May 16, 2019, 11:16 PM IST
स्मृती इराणी जिंकणार - एकता कपूर  title=

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडणार आहे. नेत्यांच्या घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप यांच्या चर्चां सर्वत्र रंगताना दिसत आहे. २३ मे रोजी समोर येणाऱ्या निकालाची उत्कंठा मतदारांसह उमेदवारांना सुद्धा लागली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कलाविश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने निकालाच्या आधीच शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगनात उतरल्या आहेत. त्यांची लढत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सोबत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#soulsearching #saturday leads me to my very own ektaravikapoor Therapist ,friend , advisoryou cannot be bound by a single adjectiveyou bring a world full of joy & adventures to my life every time we meet 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

एकेकाळी छोटा पडदा एकत्र गाजवलेल्या स्मृती इराणींना त्यांच्या मैत्रिणीने प्रोत्साहन दिले आहे. स्मृती इरानींनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर दोघींचा एक फोटो शेअर केला.

इरानी २०१४ साली अमेठी मतदार संघातून निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या होत्या, पण त्यांना राहुल गांधींनी पराभूत केले होते. आता या वेळेस बाजी कोण मारणार हे येणारा काळचं ठरवेल.