Yami Gautam Birthday: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. यामीचा आज 34 वा वाढदिवस आहे. यामीनं तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. आज यामीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. (Yami Gautam keratosis pilaris skin disease) यामीनं काही दिवसांपूर्वीच ती अनेक दिवसांपासून एका आजाराशी झुंज देत असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यामीनं हा खुलासा केला होता. (Yami Gautam Birthday Special)
यामीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 'हा एक असा आजार आहे, ज्यावर कोणताही उपाय अस्तित्वात नाही. यामीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘हल्लीच माझं एक फोटोशूट झालं होतं आणि फोटो पोस्ट प्रोडक्शनसाठी पाठवण्यात येणार होते. त्याचवेळी मी ठरवलं की मला असणाऱ्या या आजाराचा स्वीकार करण्यात काहीच चूक नाही. मी तारुण्यावस्थेत असल्यापासून या आजाराशी लढत आहे. याचं नाव आहे केराटोसिस पिलारिस.' (Yami Gautam 34th Birthday)
Just let it be... (Yes, I do talk out loud to myself).
For those who haven't heard about this, it’s a skin condition wherein you get tiny bumps on the skin. I promise they aren’t as bad as your mind and your neighbor aunty makes it out to be ) pic.twitter.com/jWD3ydMyTi
— Yami Gautam Dhar (@yamigautam) October 4, 2021
पुढे यामी म्हणाली, 'ज्यांना या आजाराविषयी माहिती नाही, त्यांच्यासाठी.... मी या आजारपणाविषयी तुम्हाला सांगू इच्छिते. या आजारामध्ये चेहऱ्यावर लहान लहान पुरळं येतात. हे इतकेही वाईट नसतात जसं त्यांच्याकडे पाहिलं जातं. लहान वयातच माझ्या चेहऱ्यावर हे पुरळ दिसले ज्यावर कोणताच उपाय नाही. मी अनेक वर्षे हे सहन केलं. शेवटी मी माझ्यामध्ये असणाऱ्या या गोष्टीचा स्वीकार केला. मी तुम्हा सर्वांसोबत माझं हे सत्य शेअर केलं.' (Yami Gautam birthday special actresss talk about her keratosis pilaris skin disease)
1. जांघा, गालांवर वेदना असणारे पुरळ येणं
2. पुरळ आलेली त्वचा रुक्ष दिसणं
3. त्वचेवर असणारी ही त्वचा खरखरीत दिसणं